शहरं
Join us  
Trending Stories
1
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
2
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
3
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
4
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
5
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
6
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
7
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
8
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
9
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
10
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
11
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
12
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
14
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
15
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
16
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
17
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
18
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
19
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
20
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

कापूस साठ्याला आपत्तीची भिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 12:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील चार हजार शेतकऱ्यांचा कापूस खरेदी बाकी आहे़ प्रथमच मे आणि जून महिन्यात सीसीआयची ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील चार हजार शेतकऱ्यांचा कापूस खरेदी बाकी आहे़ प्रथमच मे आणि जून महिन्यात सीसीआयची केंद्रे सुरु असून येत्या काळात पावसाळा आणि कृत्रिम आपत्ती यापासून कापसाचा बचाव करण्यासाठी सीसीआय आणि बाजार समित्यांचे प्रतिनिधी कामाला लागले आहेत़
जिल्ह्यात गेल्या वर्षी पावसाळा लांबल्याने कापूस हंगाम उशिराने सुरु झाला होता़ यातून नोव्हेंबरमध्ये सुरु होणारी कापूस खरेदी डिसेंबर २०१९ मध्ये सुरु झाली होती़ ओला आणि सुका कापूस अशा वर्गवारीत कापूस खरेदी सुरु झाल्याने शेतकरी हैराण झाले होते़ विक्रमी कापसाचे उत्पादन झाले असल्याने लॉकडाऊनपूर्वी नंदुरबार येथील सीसीआयच्या केंद्रावर ९५ हजार क्विंटल तर शहादा येथील सीसीआयच्या केंद्रात १ लाख ७८ हजार ५०० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली होती़ २२ मार्चपर्यंत सुरु असलेली ही खरेदी लॉकडाऊनची घोषणा झाल्याने थांबवण्यात आली होती़ लॉकडाऊनमुळे घरातच पडून असलेल्या कापसाची खरेदी करण्याची मागणी शेतकऱ्यांची होती़ यातून चार मे पासून सीसीआयची केंद्रे पुन्हा सुरु झाली आहेत़ दोन्ही ठिकाणी ५ हजार ९४० शेतकºयांनी नोंदणी केली होती़ नोंदणी केलेल्या कापसाची सध्या खरेदी सुरु असून खरेदी केलेल्या कापसावर प्रक्रिया करुन त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी जिनिंग मिलमध्ये मजूरांची कमतरता असल्याने चिंता वाढल्या आहेत़
शहादा आणि नंदुरबार येथे साठा केलेल्या कापूस ठेवण्यासाठी सीसीआयकडे योग्य जागा असली तरी पुझे किमान दीड महिना खरेदीची प्रक्रिया सुरु राहणार आहे़ यामुळे साठा केलेल्या कापसावर आपत्तीचे संकट कायम राहणार आहे़

कापसाची सर्वाधिक लागवड असणाºया शहादा तालुक्यात यंदा शेतकºयांनी कापूस सीसीआयच्या शहादा केंद्रात देणे पसंत केले होते़ यातून २२ मार्चपर्यंत या केंद्रात थेट १ लाख ७८ हजार ५०० क्विंटल कापूस खरेदी झाली होती़ लॉकडाऊनमधून कापूस खरेदीला शिथिलता देण्यात आल्यानंतर येथे २ हजार २४८ शेतकºयांनी नोंदणी करुन कापूस खरेदीची मागणी केली होती़ यानुसार या केंद्रात ४० हजार क्विंटल कापूस खरेदी होणार आहे़ दरम्यान आजअखेरीस ६६८ शेतकºयांच्या १८ हजार १६६ क्विंटल कापसाची खरेदी पूर्ण करण्यात आली आहे़ शहादा केंद्रात खरेदी करण्यात आलेला कापूस साठा करण्यासाठी सीसीआय आणि बाजार समितीने खाजगी जिनिंग अधिग्रहीत केल्या आहेत़ याठिकाणी दीड महिन्यापर्यंत खरेदी होणाºया कापसाच्या साठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे़ यातही एखादा पाऊस पडून गेल्यास निर्माण होणाºया अडचणींवर मात करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे़ परंतू याठिकाणी सध्या उन्हाळा आणि लॉकडाऊन यामुळे मजूर मिळत नसल्याने कापसाच्या गाठी करण्याच्या कामांना संथगती आहे़ मोठ्या प्रमाणावर पडून असलेल्या कृत्रिम किंवा अपघाताने आग लागण्याची शक्यता असल्याने चिंता वाढत आहेत़

नंदुरबार बाजार समितीच्या पळाशी येथील खरेदी केंद्रात लॉकडाऊनपूर्वी ९५ हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली होती़ लॉकडाऊननंतर नोंदण्या सुरु झाल्यावर ३९ हजार क्विंटल कापूूस खरेदी करण्यात आला आहे़
पळाशी येथील सीसीआयच्या केंद्रात लॉकडाऊननंतर ३ हजार ७०० शेतकºयांनी कापूस खरेदीसाठी संपर्क केला होता़ यापैकी १ हजार २०० जणांची खरेदी पूर्ण करण्यात आली असून अद्याप अडीच हजार शेतकºयांची खरेदी शिल्लक असून केंद्रात दररोज ५० वाहने बोलावून कामकाज होत आहे़