शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
2
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
3
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
4
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
5
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
6
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
7
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
8
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
9
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
10
'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार; म्हणाली...
11
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
12
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
13
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
14
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
15
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
16
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
17
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
18
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
19
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
20
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
Daily Top 2Weekly Top 5

ठरलेल्या दराप्रमाणेच शेतकऱ्यांनी पपई तोड करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 12:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : पपई उत्पादक शेतकरी संघर्ष समिती, व्यापारी व बाजार समितीने पपई दरवाढीसाठी बोलावलेल्या बैठकीत व्यापाऱ्यांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : पपई उत्पादक शेतकरी संघर्ष समिती, व्यापारी व बाजार समितीने पपई दरवाढीसाठी बोलावलेल्या बैठकीत व्यापाऱ्यांनी एकजुटीने विरोध दर्शवत दरवाढीला अर्जाद्वारे विरोध दर्शविला होता. त्यावर शेतकºयांचे नुकसान होऊ नये म्हणून बाजार समितीने पुढाकार घेत गुरुवारी पुन्हा बैठक घेण्यात आली. त्यात १४ रुपये ५५ पैसे दर ठरवण्यात आला असून १४ फेब्रुवारीपासून या दराने पपईची तोडणी करावी, असे आवाहन पपई उत्पादक संघर्ष समितीतर्फे करण्यात आले.येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पपईच्या दराचा तिडा सोडवण्यासाठी बैठक घेण्यात आली. बैठकीला बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, सचिव संजय चौधरी, रवींद्र रावल, पपई उत्पादक संघर्ष समितीचे भगवान पाटील, विश्वनाथ पाटील, उमेश पाटील, राजू पाटील, दीपक पाटील, दिनेश पाटील, अनिल पाटील, राजू पिंजारी, जयप्रकाश पाटील, हिलाल माळी, भरत पाटील आदींसह शेतकरी व शेख हाजी नाजिम, हाजी सरताज, हाजी इकबाल, प्रकाशभाई राजस्थानवाले, राहुलभाई राजस्थानवाले, हाजी अहमद हाजी नाजीम आदी व्यापारी उपस्थित होते. पपईच्या दरवाढीसंदर्भात व्यापारी व संघर्ष समितीत चर्चा झाली. पपई उत्पादक संघर्ष समितीने सुरुवातीला व्यापाºयांशी चर्चा करताना १६ रुपये दर ठेवला. तो दर परवडत नसल्याने व्यापाºयांनी अमान्य केला. त्यानंतर सभापती सुनील पाटील, सचिव संजय चौधरी यांनी हस्तक्षेप करत व्यापाºयांना तिढा सोडवण्यास सांगितला. शेतकरी, संघर्ष समिती व व्यापारी यांची रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरुच होती.पपई हे नाशवंत पीक असल्याने आजपर्यंत शेतकरी घाबरून पपईची तोड सुरु राहू देत होते. परंतु बुधवारी भाववाढीसाठी बोलावलेल्या बैठकीला व्यापाºयांनी एकजूट दाखवत विरोध दर्शवला होता. त्यामुळे संघर्ष समितीनेही सर्व शेतकºयांना एकत्रित येण्याचे आवाहन करून पपई तोड बंद करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार सर्व शेतकºयांनी पपई तोड बंद केल्याने शेतकºयांची एकजूट पाहून व्यापारीही नरमले. बाजार समितीचे सचिव संजय चौधरी यांनी पुढाकार घेऊन तिढा सोडवण्यासाठी व्यापारी व शेतकºयांना आमंत्रित केले. त्यानुसार व्यापाºयांनी होकार देत गुरुवारी बैठक झाली. या बैठकीत शेतकºयांनी सांगितलेला भाव व्यापाºयांनी अमान्य केल्याने शेतकºयांनी बैठक संपवली. परंतु व्यापारी बसूनच होते. यावरून उत्तर भारतात पपईला दर जास्त मिळत असल्याने त्यामुळेच व्यापारी बैठक सोडून जात नव्हते. अखेर व्यापाºयांनी १४ रुपये ५५पैसे दर मान्य केला.