शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
4
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
5
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
6
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
7
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
8
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
9
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
11
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
12
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
13
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
14
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
15
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
16
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
17
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
18
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
19
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
20
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाला लिलाव पूर्ववत करण्याची शेतकऱ्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:06 IST

सातपुड्यातील दुर्गम भागात अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना जिल्हा भाजीपाला मार्केटमध्ये भाजीपाला आणण्यासाठी रात्री दोन वाजता वाहतूक व्यवस्था ...

सातपुड्यातील दुर्गम भागात अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना जिल्हा भाजीपाला मार्केटमध्ये भाजीपाला आणण्यासाठी रात्री दोन वाजता वाहतूक व्यवस्था उपलब्ध होत नसल्याने वाहतुकीअभावी भाजीपाला पिकांचे नुकसान होत आहे. खासगी वाहनधारकांकडून रात्रीची वाहतुकीसाठी जास्तीची भाडे आकारणी होत असून त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भाजीपाला मार्केटला आणणे जिकिरीचे जात असून मार्केट कमिटीने शेतकऱ्यांच्या समस्येचे गंभीर दखल घेऊन भाजीपाला लिलाव पूर्ववत सकाळी व दुपारी सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यामध्ये व्यक्त करण्यात येत आहे.

मार्केटमध्ये भाजीपाला आणण्यासाठी वाहन मिळत नसल्याने शेतात पडून असलेला भाजीपाला.

रात्री दोन वाजेच्या वेळेत शेतकऱ्यांना मार्केटच्या ठरलेल्या वेळेत भाजीपाला विक्रीस आणण्याची मुभा असून रात्री खासगी वाहनाने भाजीपाला मार्केटला आणण्याकरिता जिकिरीचे जात आहे. खासगी वाहनधारकांकडून अतिरिक्त भाडे वसूल करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे.

-रमेश वळवी,भाजीपाला उत्पादक शेतकरी

शेतकऱ्यांना भाजीपाला आणण्यासाठी वाहतूक व्यवस्था उपलब्ध होत नसल्याने भाजीपाला खराब होत आहे. भाजीपाला मार्केट कमिटीने लिलाव सकाळी ५वाजता व दुपारी दोन वाजेपासून सुरू केले तर शेतकऱ्यांना भाजीपाला मार्केटला सकाळी किंवा दुपारी आणता येईल.

-संजय पाटील,भाजीपाला उत्पादक शेतकरी