शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

बेज्याआंबा व भट्टीपाड्याला असुविधेचा वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दुर्गम भागातील गौऱ्याच्या बेज्याआंबा व भट्टीपाडा या दोन्ही पाड्यांच्या चौफेर गाव पाड्यांपर्यंत रस्ते पोहोचले ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दुर्गम भागातील गौऱ्याच्या बेज्याआंबा व भट्टीपाडा या दोन्ही पाड्यांच्या चौफेर गाव पाड्यांपर्यंत रस्ते पोहोचले आहेत, परंतु हेच दोनपाडे रस्ते विकासापासून वंचित राहिले आहे. त्यामुळे तेथे अन्य विकासकामेही होऊ शकली नाही. पायाभूत सुविधाही मिळत नसल्याने तेथील नागरिकांची गैरसोय होत आहे.धडगाव तालुक्यातील गौºया हे तळोदा ते धडगाव या मुख्य रस्त्यावरील गाव असून १३ पाड्यांमध्ये विभागले आहे. तसे हे गाव विविध योजना व सुविधांंबाबत नेहमीच चर्चेत राहिले असून बोदलापाड्याच्या माध्यमातून प्रकाशात आले. बोदलापाड्याच्या काही समस्या कायम असतांनाच पुन्हा भट्टीपाडा व बेज्याआंबापाडा या दोन पाड्यांबाबत चर्चा सुरू झाली आहे.भट्टीपाड्यापर्यंत जाण्यासाठी सन २००० मध्ये रस्ता मंजूर करीत कामही करण्यात आले. परंतु वरवरच्या खडीकरणचे काम वगळता या रस्त्यावर अन्य कुठलेही काम करण्यात आले नाही. त्यामुळे हा रस्ता कुठल्याही वाहतुकीसाठी अनुकुल ठरत नाही. रस्त्याचे काम होऊन २० वर्षांचा कालावधी उलटला, त्यामुळे सद्यस्थितीत हा रस्ता पायवाटेपेक्षा अधिक खराब झाला आहे. कुटबारापासून झालेल्या या रस्त्याची दोन वर्षापूर्वी दुरुस्ती करण्यात आली. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कुठल्याही योजनेतून निधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे म्हटले जात आहे.या दोन्ही पाड्याच्या चौफेरील गौºया, चुलवड, बिजरी, काकरपाटी व सिसा या गावांपर्यंत रस्ते पोहोचले आहे. या पाजही गावांना लागून असलेल्या या दोन पाड्यांपर्यंतच रस्ता पोहोचला नसल्याने शोकांतिका व्यक्त होत आहे.नागरिकांना बिजरी, बियारावड, काकरपाटी व चुलवड येथून वाहन उपलब्ध होते. परंतु त्यांना प्रत्येक ठिकाणी पोहोचण्यासाठी चार किलोमिटर पायपीट करावी लागते.पाण्याची सुविधा असली तरी लोकसंख्येच्या तुलनेत पुरेशी ठरत नाही. त्यामुळे नागरिकांना उदय नदीवरुन पिण्यासाठी पाणी घ्यावे लागते. हे पाणी पितांना शुद्धतेच्या दृष्टीने शाश्वत ठरत नाही.भट्टीपाड्याची लेकसंख्या ५०० तर बेज्याआंबापाड्यात ९ कुटुंब वास्तव्यास आहे. त्यांना विकास प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न होणे अपेक्षित आहे.