शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

कार्यक्षेत्रातील कामातून सूट द्यावी अन्यथा बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2020 12:45 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  कोरोना महामारीच्या काळात आरोग्य कर्मचारी जीवाचे रान करुन काम करीत आहेत. मात्र वरिष्ठ पातळीवर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  कोरोना महामारीच्या काळात आरोग्य कर्मचारी जीवाचे रान करुन काम करीत आहेत. मात्र वरिष्ठ पातळीवर या कामाला महत्व नसल्याचे समोर आले आहे. यामुळे कोरोनाचे कामाचे आदेश देतांना कार्यक्षेत्रातील नियमित कामांतून सुट मिळावी अशी मागणी आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.जि.प.आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष अभयसिंग चित्ते यांनी शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी आर.के.गावडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके यांना निवेदन दिले. कोरोना महामारीला सुरुवात झाल्यानंतर राज्यात आपत्ती  व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला. यांनतर कोविड कामांना प्राधान्य देण्यात आले. यामुळे सर्व आरोग्य कर्मचार्‍यांना कोविड कामासाठी वेगवेगळ्या ठिकाणी कर्तव्य बजावण्यासाठी आदेशीत करण्यात आले होते. वरिष्ठांच्या आदेशानुसार आरोग्य कर्मचारी दिवसरात्र कामे केले. कर्मचार्‍यांना पुन्हा कार्यक्षेत्राबाहेरील कामांसाठी जुंपण्यात येण्याची शक्यता कर्मचा-यांनी व्यक्त केली.कर्मचा-यांना कोरोनाचे काम करीत असतांना कार्यक्षेत्रातील कामातून सुट मिळावी, कोविड कर्तव्यासाठी जातांना वैद्यकिय अधिकारी यांनी कार्यमुक्त करावे व येतांना पुन्हा कामावर हजर करुन घ्यावे. कोविड कार्य करीत असतांना कार्यक्षेत्रात साथ उद्भवल्यास किंवा काही विपरीत घडल्यास आरोग्य कर्मचार्‍यांना जबाबदार धरण्यात येवू नये. आरोग्य कर्मचार्‍यांना सुरक्षा साधने अर्थात एन-९५ मास्क, सॅनिटायझर, फेस शिल्ड, ग्लोव्हज् आदि सुरक्षा साधने पुरवठा कार्यालयामार्फत  पुरविण्यात यावीत आदी मागण्यांचा त्यात समावेश आहे. जिल्हाधिकारी डॅा.भारूड यांनी सांगितले, नंदुरबार जिल्ह्यात कोरोना आटोक्यात आणण्यात आरोग्य कर्मचार्‍यांच्या सिंहाचा वाटा आहे. वरिष्ठ पातळीवर या कामांची माहिती देण्यासाठी लक्ष घालून  स्वतः वरिष्ठांशी बोलणार आहे. कोरोना कामांना केंद्र व राज्य शासनाने प्राधान्यक्रम दिला आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचार्‍यांची सेवा महत्वपूर्ण ठरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.