शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाशी लढण्यासाठी माजी सैनिक मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 13:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : देशाच्या सुरक्षिततेसाठी सीमेवर २० वर्षे सेवा देत निवृत्त झालेल्या माजी सैनिकांनी कोरोना विषाणू संकटाशी ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : देशाच्या सुरक्षिततेसाठी सीमेवर २० वर्षे सेवा देत निवृत्त झालेल्या माजी सैनिकांनी कोरोना विषाणू संकटाशी लढण्यासाठी प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून सेवानिवृत्तीनंतरही शहराच्या रक्षणासाठी पुन्हा मैदानात उतरले आहे. शहरातील विविध ठिकाणी ते बंदोबस्त करीत आहे.तालुक्यातील पूर्व भागातील अनेक गावातील तरूण सैन्यदलात नोकरीला आहेत. कित्येक वर्षांपासून पिढ्यानपिढ्या या भागातील नागरिक सैन्यदलात नोकरी करून आपल्या गावासह तालुक्याचा नावलौकीक राखून आहे. सेवानिवृत्तीनंतर शांतपणे जीवन जगायचे असा अलिखित नियम असतानाही केवळ आपल्या देशावर नाहीतर आपल्या तालुक्यासह परिसरावर संकट आले म्हणून आपल्या अंगी असलेला सैनिकी बाणा या सैनिकांना स्वस्थ बसू देईना. या संकट समयी प्रशासनाला मदत म्हणून सहकार्य करायला तालुक्यातील माजी सैनिक सरसावले असून, त्यांनी प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांची भेट घेऊन या संकट समयी आम्ही आपणास काय मदत करू शकतो असा प्रश्न विचारून शहरात बंदोबस्तासाठी आम्हाला नेमावे अशी या सैनिकांनी मागणी केल्यानंतर त्यांना शहरात विविध ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे.कोरोना विषाणूचे संकट उद्भवल्यानंतर याची लागण शहरात झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक रूग्ण शहरात आढळून आले आहे. १८ मार्चपासून शहरातील महसूल, पोलीस व पालिका प्रशासन २४ तास तत्पर असून, या संकट समयी नागरिकांनी घरीच राहावे असे, आवाहन करीत आहे. मात्र दुर्देवाने काही नागरिक प्रशासनाच्या या आव्हानाला न जुमानता विनाकारण शहरात गर्दी करत असल्याने प्रशासनावरील ताण कमालीचा वाढला आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाला मदत करण्यासाठी भारतीय सैन्य दलात सेवानिवृत्ती झालेल्या माजी सैनिकांनी शहरात सेवा देण्याचा निर्णय घेतला. यात संतोष युवराज पाटील, भानुदास ताराचंद देवरे, भाऊराव सदाशिव सोनवणे, रवींद्र शिवाजी पवार, सर्व रा.मंदाणे, दीपक नारायण निकम, रा. दामळदा, दिलीपसिंग गिरासे, रा.डोंगरगाव, रामसिंग सुळे, रा.वडगाव, केवलसिंग गिरासे, सिताराम दशरथ भिल, पिंपर्डे, ता.शहादा यांचा समावेश आहे.माजी सैनिकांच्या या निर्णयाचे स्वागत शहादेकरांनी केले असून, त्यांच्या सन्मानार्थ शहरातील गर्दी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन दिवसापासून हे सैनिक शहरातील विविध भागात आपली सेवा देत असून, परिणामी शहरातील गर्दी कमी झाली आहे.