पेट्रोल विक्री बंद तरीही वाहनांची संख्या जैसे थे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 11:46 AM2020-04-05T11:46:43+5:302020-04-05T11:46:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरी हद्दीत पेट्रोल पंप बंद असतांनाही दुचाकी व तीनचाकी वाहने मोठ्या संख्येने शहरात फिरत ...

 Even though petrol sales are off, the number of vehicles is the same | पेट्रोल विक्री बंद तरीही वाहनांची संख्या जैसे थे

पेट्रोल विक्री बंद तरीही वाहनांची संख्या जैसे थे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरी हद्दीत पेट्रोल पंप बंद असतांनाही दुचाकी व तीनचाकी वाहने मोठ्या संख्येने शहरात फिरत आहेत. या वाहनांना इंधन कुठून मिळत आहे हा प्रश्न सध्या पोलीस आणि प्रशासनालाही पडला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून नंदुरबारसह जिल्ह्यातील पालिका आणि नगरपंचायत हद्दीतील सर्व पेट्रोल व डिझेलपंप बंद करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह व्यावसायिकांना पेट्रोल भरण्याची परवानगी आहे. सामान्य लोकांना पेट्रोल व डिझेलचे वितरण बंद केले आहे. यामुळे किमान विनाकारण शहरात फिरणाऱ्यांवर लगाम लागेल अशी अपेक्षा प्रशासनाची होती. परंतु शहरातील वाहनांची संख्या जैसे थे कायम आहे. मोठ्या प्रमाणावर वाहने शहरात फिरतांना दिसून येत आहेत. सकाळी ८ ते १२ या वेळेत खरेदीसाठी गर्दी होत आहे. त्यामुळे या वाहनांना कुठून आणि कसे पेट्रोल मिळते असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ही बाब लक्षात घेता आता शहरातील सर्वच पेट्रोलपंपांवर पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे. पेट्रोलपंपांचे प्रवेशद्वार देखील बंद करण्यात आले असून संबधित ठिकाणी एक किंवा दोन कर्मचारीच थांबत आहेत. नागरिकांनी देखील विनाकारण वाहने गावात फिरवू नयेत. आपल्या जवळच्या ठिकाणाहून अत्यावश्यक वस्तू अर्थात किराणा, दूध, भाजीपाला खरेदी करावा. त्यासाठी वाहनाचा वापर टाळावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Web Title:  Even though petrol sales are off, the number of vehicles is the same

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.