शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

जयनगर येथे ग्रामदक्षता समितीची आणि विलगीकरण कक्षाची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:30 IST

यामध्ये ग्रामदक्षता समिती स्थापन झाल्यावर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण गावात निर्जंतुकीकरण फवारणी तसेच कोरोनाबाधित रुग्ण आढळलेल्या क्षेत्रास प्रतिबंधित क्षेत्र ...

यामध्ये ग्रामदक्षता समिती स्थापन झाल्यावर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण गावात निर्जंतुकीकरण फवारणी तसेच कोरोनाबाधित रुग्ण आढळलेल्या क्षेत्रास प्रतिबंधित क्षेत्र करण्याविषयी चर्चा करण्यात आली. तसेच ज्या घरांमध्ये बाधित रुग्ण आढळून येतील, त्या कुटुंबातील इतर सदस्यांसाठी विलगीकरण विषयावर चर्चा करून जि. प. मराठी शाळा येथे विलगीकरणाची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

शासनाने कोरोनाचा प्रभाव कमी होण्यासाठी अंशतः लॉकडाऊनसह अनेक निर्बंध लादले आहेत. शासन आदेशान्वये संपूर्ण गावात कडकडीत लॉकडाऊन असून अत्यावश्यक सेवा वगळता बाकीची दुकाने बंद ठेवली जात आहेत. जोपर्यंत शासन आदेश येत नाही तोपर्यंत इतर दुकाने कायमस्वरूपी बंद ठेवली जाणार आहेत.

याव्यतिरिक्त ग्रामस्थांनी घाबरून न जाता आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याचे तसेच काम असेल तरच बाहेर निघण्याचे व वेळोवेळी सॅनिटायझरने हात धुण्याचे व तोंडाला मास्क वापरण्याचे आवाहन ग्रामदक्षता समितीतर्फे वेळोवेळी करण्यात येणार आहे. बैठकीस सरपंच मीना सोनवणे, उपसरपंच सुनील माळी, समितीचे माजी उपसभापती ईश्वर माळी, ग्रामपंचायत सदस्य छगन पारधी, महात्मा फुले युवा मंचचे संस्थापक-अध्यक्ष ईश्वर संतोष माळी, ग्रामसेवक केशव वसावे, माजी उपसरपंच अशोक माळी, माजी उपसरपंच किशोर माळी, अंकुश सोनवणे, कांतीलल माळी, पोलीस पाटील संदीप चित्ते, कोतवाल दयाराम भिल, अशोक करंजे, मोहन पारधी, लखीचंद माळी, रोजगार सेवक संजय पाटील, शिपाई काशिनाथ पाटील उपस्थित होते.