शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
3
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
4
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
5
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
6
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
7
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
8
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
9
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
10
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
11
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
12
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
13
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
14
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
15
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
16
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
17
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
18
Marathi News LIVE: पेट्रोल आणि डिझेल कमी वापरा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, ऑनलाइन शिक्षण सुरू करा; PM मोदींचे सलग दुसऱ्या आवाहन
19
"निवडणुका जिंकण्यासाठी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेची राखरांगोळी केली..."; काँग्रेसचा टोला
20
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
Daily Top 2Weekly Top 5

डीबीटी धोरणाच्या अभ्यास व समिक्षेसाठी ‘गट’ स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2020 12:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : शाळा आणि शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या डीबीटी अर्थात थेट लाभ हस्तांतरण धोरणाचा अभ्यास व ...

लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : शाळा आणि शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या डीबीटी अर्थात थेट लाभ हस्तांतरण धोरणाचा अभ्यास व समीक्षा करण्यासाठी अभ्यासगटाची स्थापना करण्यात आली आहे. अभ्यासगटाच्या अध्यक्षपदी माजी मंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहात शिक्षणासाठी निवासी राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दैनंदिन वापराच्या वस्तू, भोजन, शैक्षणिक साहित्य व अन्य स्टेशनरी मोफत उपलब्ध करून देण्यात येत होती. परंतु या वस्तंूच्या खरेदी व पुरवठा याबाबत मोठ्या तक्रारी होत होत्या़ अनेकदा विद्यार्थ्यांना पुरवठा केल्या जाणाºया वस्तू व इतर साहित्याच्या गुणवत्ता व दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले गेले होते. या सर्व प्रकारामुळे न्यायालयीन प्रकरणेही निर्माण झाली़ या बाबी विचारात घेता वैयक्तिक दैनंदिन वापराच्या वस्तू विद्यार्थ्यांच्या पालकांना सहज खरेदी करता येऊ शकत असल्याने आदिवासी विकास विभागाने २०१७-१८ पासून या वस्तूंसाठी थेट निधी देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला होता. प्रारंभी शासकीय आश्रमशाळेत डीबीटी धोरण राबविताना संबंधित लाभार्थींनी वस्तू प्रथम खरेदी केल्यानंतर शासनाने निश्चित केलेल्या रक्कमेची प्रतिपूर्ती करण्यात येत होती़ मात्र आदिवासी विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन विभागाने आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना आगाऊ निधी देण्याचा निर्णय घेतला होता. तसेच वसतिगृहातील विद्यार्थ्यांना वैयक्तिक वापराच्या वस्तू खरेदी करण्यासाठी सर्वच निधी आगाऊ देण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. भोजनासाठी तीन महिन्याचा निधी विद्यार्थ्यांना आगाऊ देण्याची तरतूद करण्यात आली. यातून विद्यार्थी भोजन पुरवठादारास वेळेवर रक्कम देऊ शकतील किंवा विद्यार्थी समूह तयार करुन साहित्य खरेदी करत सहकारी तत्त्वावर खानावळ चालवू शकतील अशी अपेक्षा होती़ परंतु डीबीटी योजना बंद करावी या मागणीसाठी राज्यात अनेक आंदोलने होत होती़ रोख रक्कम हातात आल्याने मुलांकडून त्याचा वापर सकस आहारासाठी न झाल्याने आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले होते़ त्यामुळे डीबीटी योजना रद्द करण्याची मागणी होत आहे. या सर्व बाबींचा विचार करून आश्रमशाळा व वसतिगृहात शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांकरिता सुरू असलेल्या डीबीटी धोरणाच्या अभ्यासासाठी गट स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

या अभ्यासगटाचे अध्यक्ष म्हणून माजी क्रीडामंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सहा सदस्यीय असणाºया या समितीत सदस्य म्हणून सामाजिक कार्यकर्ते आर.के. मुटाटकर, यवतमाळ येथील प्रा. हरिदास सुर्वे, पुणे येथील गोखले इन्स्टिट्यूट आॅफ पॉलीटीक्स अ‍ॅण्ड इकॉनॉमिक्सचे संचालक राजस परचुरे, लेखा व कोषागार मुंबईचे निवृत्त संचालक डॉ.रवींद्र जाधवराव यांची निवड करण्यात आली आहे. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्त पवनीत कौर ह्या अभ्यास समितीच्या सदस्य सचिव असणार आहेत.

ही समिती डीबीटी धोरण सुरु होण्यापूर्वी तीन वर्षाच्या आणि डीबीटी सुरु झाल्यापासून आतापर्यंतच्या कालावधीतील परिणामांचा अभ्यास करणार आहे. शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहातील विद्यार्थी वैयक्तिक वापराच्या वस्तू व लेखन साहित्य, पुस्तके इत्यादी बाबीसाठी तसेच जिल्हा, विभाग व महानगरपालिका स्तरावरील वसतिगृहामधील विद्यार्थ्यांना भोजनासाठी देण्यात येणाºया डीबीटी धोरणाचा अभ्यास करणार आहे़ पूर्वीप्रमाणे दैनंदिन वापराचे साहित्य वस्तू स्वरुपात द्यावे, आहारासाठी भोजन ठेके सुरू करावेत किंवा डीबीटी धोरणच सुरु ठेवावे याचीही समीक्षा व डीबीटीबाबत अभ्यास करुन त्यात सुधारणाही सूचवणार आहे़

अभ्यास करण्यासाठी ही समिती विद्यार्थी व त्यांचे पालक यांच्याशी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहे. डीबीटीच्या विविध पर्यायामधून आश्रमशाळा, वसतिगृहे यांना भेट देऊन सर्वेक्षण करणार आहे. यात नंदुरबार, गडचिरोली, पालघर, धारणी, कळवण येथील आश्रमशाळा आणि वसतीगृहांचा समावेश राहिल़ या अभ्यासगटाला त्यांचा अहवाल आदिवासी विकास विभागास स्थापना झाल्यापासून एक महिन्याच्या कालावधीमध्ये सादर करावा लागणार आहे. समितीच्या कामाच्या समन्वयाची जबाबदारी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे येथील आयुक्त यांची राहणार आहे.