शहरं
Join us  
Trending Stories
1
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
2
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
3
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
4
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
5
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
6
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
7
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
8
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
10
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
11
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
12
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
13
बीड महामार्ग भूसंपादन घोटाळा: तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक पोलिसांच्या ताब्यात
14
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
15
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
16
मार्कशीटमधील खाडाखोड कळली अन् बापाची सटकली; ९ वर्षांच्या मुलीला क्रूरपणे संपवलं, नंबर १ चा होता अट्टहास
17
रंगांचा खेळ! रेड, ग्रीन तर माहितीय पण फूड पॅकेजिंगवरील ब्लू, येलो मार्कचा नेमका अर्थ काय?
18
१०,००० किमी मारक क्षमता, अनेक बडे देश टप्प्यात, अग्नी-६ सुपर क्षेपणास्त्र तयार, भारत जगाला दाखवणार ताकद
19
तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही...
20
थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले...
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीन हजार मजुरांना रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 12:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत तालुक्यातील २५ ते ३० गावांमध्ये पावसाळ्यापूर्वी कामांना सुरुवात ...

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत तालुक्यातील २५ ते ३० गावांमध्ये पावसाळ्यापूर्वी कामांना सुरुवात झाली आहे. या कामांमुळे सुमारे साडेतीन हजार मजुरांच्या हाताला काम मिळाले असून त्यांचा रोजगाराचा प्रश्न सुटला आहे. लॉकडाऊन काळात रोजगार उपलब्ध झाल्याने मजुरांमध्येही समाधान व्यक्त होत आहे.
शहादा तालुक्यात लॉकडाऊन काळात सर्वच शेती कामे व व्यवसाय ठप्प झाले होते. याचा फटका ग्रामीण भागातील शेतकरी व मजुरांना मोठ्या प्रमाणावर बसला. एप्रिल-मे महिन्यात पपई, केळीची तोड केली जाते. मात्र यावर्षी खरेदीसाठी व्यापारीच न आल्याने ही फळपिके झाडावरच सडून नष्ट झाली. अशीच परिस्थिती संपूर्ण जिल्ह्यात झाली आहे. त्यातच कामे नसल्याने हातमजुरी करणाऱ्या कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न भेडसावत होता. जिल्ह्यातील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी मजुरांना त्यांच्याच गाव परिसरात रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत मजुरांना कामे उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या तीन-चार दिवसांपासून शहादा तालुक्यातील पंचायत समिती, वन विभाग व कृषी विभाग यांच्यामार्फत कामांना गती मिळाली आहे.
शहादा वन विभागांतर्गत तालुक्यातील मानमोडे, धांद्रे, शहाणे, नवानगर, वडगाव, पिंपराणी, वीरपूर, चिंचोरा, नवागाव व उभादगड या भागात वृक्षलागवडीच्या कामांना प्राधान्य देण्यात आल्याची माहिती वनक्षेत्रपाल अनिल पवार यांनी दिली. त्याचप्रमाणे शहादा पंचायत समिती व कृषी विभाग यांच्या अंतर्गत पूर्व भागात असलेल्या ग्रामीण भागातील मजुरांना कामे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. आडगाव, अंबापूर, धांद्रे, जाम, जवखेडा, तिधारे दिगर, कलमाडी, अमरावती, खापरखेडा, खरगोन, लंगडी भवानी, मानमोडे, पुरुषोत्तमनगर, रामपूर, शोभानगर, सोनवलतर्फे शहादा, लोंढरे, वडाळी, कवळीथ, गणोर, बिलाडी त.सा., गोगापूर यासह ३० गावांना गाळ काढणे, शोषखड्डा आदी कामे सुरू झाले असून या कामांवर तीन ते चार हजार मजूर कामावर असल्याची माहिती शहादा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सी.टी. गोसावी यांनी दिली.

परराज्यात गेलेले मजूर लॉकडाऊनमुळे गावागावात परत आले आहेत. तालुक्यात मजुरांना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे सुरू झाल्याने स्थानिक मजुरांना कामे उपलब्ध झाल्याने त्यांच्या कुटुंबाचा उदरनिवार्हाचा प्रश्न सुटला आहे. परराज्यातून आल्यानंतर लागलीच रोजगार उपलब्ध झाल्याने या मजुरांनी समाधान व्यक्त केले आहे. पंचायत समिती, वनविभाग व कृषी विभाग यांच्यामार्फत जास्तीत जास्त कामे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती संबंधित विभागाच्या प्रमुखांनी दिली.