शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीत कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळाले मानधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:32 IST

नंदुरबार : जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या ८६ पैकी ६४ ग्रामपंचायतींमध्ये प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम पार पडला होता. यासाठी १ हजार ...

नंदुरबार : जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या ८६ पैकी ६४ ग्रामपंचायतींमध्ये प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम पार पडला होता. यासाठी १ हजार २७१ कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. या कर्मचाऱ्यांना मानधनाची रक्कम नुकतीच वर्ग करण्यात आली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

डिसेंबर २०२० पासून जिल्ह्यात ८६ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. दरम्यान, २२ ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्याने ६४ ग्रामपंचायतीत प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम सुरू होता. यासाठी प्रशासनाला ४० लाख रुपयांचा खर्च करावयाचा होता. या खर्चाची पूर्तता निवडणूक आयोगाला ग्रामविकास विभागाने केल्यानंतर कामकाज सुरू झाले होते. जिल्ह्यात प्राप्त झालेल्या खर्चानंतर तालुकास्तरावर हा निधी वितरित करण्यात आला आहे. यांतर्गत कर्मचारी मानधन वर्ग करण्यात आल्याची माहिती आहे.

राज्यातील इतर भागात ग्रामपंचायत निवडणूक खर्चाबाबत अनेकविध प्रश्न निर्माण झाले असताना जिल्हा प्रशासनाने तालुकास्तरावर दिलेल्या २३ लाख ५० हजाराच्या निधीतून कर्मचारी मानधन पूर्ण करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार नंदुरबार तालुक्यासाठी ६ लाख ४२ हजार, शहादा ७ लाख ८८ हजार, नवापूर ४ लाख ८ हजार, तळोदा २ लाख ४ हजार, धडगाव ४ लाख ६७ हजार तर अक्कलकुवा तालुक्यासाठी २९ हजार रुपयांचा निधी देण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे. एकूण २३ लाख ५० हजार रुपयांचे वाटपही पूर्ण झाले आहे.