शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतर रोखण्यासाठी रोजगार निर्मितीवर भर द्या- ॲड. के.सी. पाडवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:32 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा पोलीस ...

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अविशांत पंडा, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी शाहूराज मोरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रघुनाथ भोये, तहसीलदार उल्हास देवरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना ॲड.पाडवी यांनी सांगितले की, सातपुडा हिरवागार करण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात. वनविभागाने अस्तंबा शिखर परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करावी. उत्पन्न देणाऱ्या प्रजातिंची प्राधान्याने लागवड करण्यात यावी. पाझर तलावाची आणि गाळ काढण्याची कामे सुरू करण्यात यावी. वाहतूक नियमाविषयी जनजागृतीवर भर देण्यात यावा. ट्रॅक्टरच्या मागील बाजूस रिफ्लेक्टर लावण्यात यावेत. वाहतूक नियमांचे कठोरतेने पालन करण्यासोबत वाहनचालकांना आवश्यक माहिती देण्यात यावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. यावेळी पालकमंत्र्यानी जिल्ह्यातील कोरोना सद्य:स्थिती, नवापूर येथील बर्ड फ्लू, महाआवास अभियान प्रगतीबाबत आढावा घेतला. पात्र लाभार्थ्यांना विविध योजनेच्या माध्यमातून हक्काचे घर देण्यासाठी कार्यवाहीला गती द्यावी, असेही ॲड. पाडवी म्हणाले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भारुड यांनी प्रशासनातर्फे करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. जिल्ह्यात ५५ हजारांपेक्षा अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या आसून त्यात आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या सर्वाधिक आहे. गृह विलगीकरण निर्णयाचा चांगला परिणाम झाला असून त्यामुळे संसर्ग नियंत्रित करण्यात यश आले असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीस विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.