शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
4
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
5
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
6
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
7
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
8
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
9
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
10
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
11
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
12
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
13
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
14
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
15
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
16
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
17
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
19
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
20
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार तालुक्यात आठ ठिकाणी निवडणूक,धडगाव तालुक्यात प्रभाग बिनविरोध,तळोद्यात निवडणूक सात ग्रामपंचायती       

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  तालुक्यातील २२ ग्रामपंचाय  निवडणूक कार्यक्रमांतर्गत माघारीच्या अंतिम मुदतीपर्यंत १४ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून केवळ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  तालुक्यातील २२ ग्रामपंचाय  निवडणूक कार्यक्रमांतर्गत माघारीच्या अंतिम मुदतीपर्यंत १४ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून केवळ आठ ठिकाणी मतदान होणार आहे.  गावागावातील ज्येष्ठांसह विद्यमान सदस्य व इच्छुकांमध्ये समझोता झाल्यानंतर झालेल्या निर्णयाअंती या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.           तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींच्या ७० प्रभागातून ४७३ अर्ज मुदतीअंती दाखल झाले होते. यातील १४ अर्ज अवैध ठरल्याने ४५९ अर्ज वैध ठरले होते. या अर्जांकडे माघारीच्या अंतिम मुदतीपर्यंत लक्ष लागून होते. दरम्यान, सोमवारी माघारीच्या अंतिम मुदतीपर्यंत १४ ग्रामपंचायतींमधील १९४ अर्ज मागे घेतले गेले. यातून या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. बिनविराेध झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये खुर्दे खुर्द, बलदाणे, खोक्राळे, निंभेल, न्याहली, शनिमांडळ, तलवाडे खुर्द, तिलाली, आराळे, खोंडामळी, मांजरे, शिंदगव्हाण, विखरण आणि काकर्दे यांचा समावेश आहे. दरम्यान, ही गावे बिनविरोध झाल्यानंतर आता कंढरे, भादवड, कार्ली, वैंदाणे, भालेर, हाटमोहिदे, कोपर्ली व नगाव या गावांमधील २७ प्रभागांसाठी निवडणूक कार्यक्रम होणार आहे. दिवसभरात तब्बल ४३ प्रभागातून १९४ अर्ज मागे घेतले गेल्याने २२ पैकी १४ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यानंतर आठ गावांमधील निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना चिन्ह वाटपाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. दरम्यान, माघारीसाठी मोठ्या संख्येने गावोगावचे पुढारी तहसील कार्यालयात दाखल झाल्याने याठिकाणी मोठी गर्दी उसळली होती. दरम्यान, अर्ज छाननीच्यावेळी तालुक्यातील सात ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले होते. उर्वरित सात ग्रामपंचायती या आजच्या दिवशी बिनविरोध झाल्याने एकच जल्लोष करण्यात आला. तालुक्यातील भालेर, कोपर्ली आणि हाटमोहिदा या मोठ्या ग्रामपंचायतींकडे लक्ष लागून राहणार आहे. चिन्ह वाटप होताच निवडणूक लढवणारे इच्छुक गावाकडे रवाना झाले होते. त्यांच्याकडून तयारीला सुरुवात करण्यात आल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवार व पॅनलप्रमुखांकडून तहसील कार्यालय आवारातच जल्लोष करण्यात येत होता.नंदुरबार तालुक्यातील मतदान होणा-या आठ ग्रामपंचायतींपैकी भालेर व कोपर्ली या दोन ग्रामपंचायती सर्वाधिक लक्ष्यवेधी आहेत. या ठिकाणी प्रचाराच्या विविध क्लृप्त्या लढवल्या जात आहेत. 

धडगाव तालुक्यात प्रभाग बिनविरोध  धडगाव तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींसाठी एकूण ४०९ अर्ज वैध ठरवण्यात आले होते. यातील ७६ अर्ज सोमवारी अंतिम मुदतीअंती माघारी घेण्यात आले होते. यातून ३३३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. धडगाव तालुक्यातील धनाजे व भोगवाडे या ग्रामपंचायतींमधील प्रत्येकी दोन प्रभाग बिनविरोध झाले आहेत. तालुक्यात निवडणूकीची रंगत वाढत असून सर्वच ठिकाणी मतदान होणार असल्याने उमेदवार सोमवारी सायंकाळपासून प्रचाराला लागल्याचे दिसून आले होते. 

तळोद्यात निवडणूक १३४ रिंगणात ; सात ग्रामपंचायती                                                                                                                                                     तळोदा तालुक्यातील सात ग्रामपंचायतींसाठी सोमवारी माघारीच्या मुदतीत १७९ वैध अर्जांपैकी ४७ जणांनी माघार घेतली. यातून निवडणूक रिंगणात ४७ उमेदवार आहेत. तालुक्यात सर्वाधिक उमेदवार हे रेवानगर ग्रामपंचायतीसाठी निवडणूक लढवत आहेत.  तालुक्यात सर्वाधिक उमेदवार हे रेवानगर ग्रामपंचायतीसाठी निवडणूक लढवत आहेत. तालुक्यातील रेवानगर, नर्मदानगर, सरदार नगर, रोझवा पुनर्वसन, बंधारा, राणीपूर आणि पाडळपूर अशा सात ग्रामपंचायतींचा कार्यक्रम लागून करण्यात आला होता. सात ग्रामपंचायतीच्या ५१ जागांसाठी १८२ जणांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. यातील तीन बाद ठरले होते. तर १७९ अर्ज वैध ठरले होते. दरम्यान सोमवारी माघारीच्या अंतिम मुदतीत ४७ जणांनी अर्ज मागे घेतल्याने ५१ सदस्यपदांच्या जागांसाठी १३४ जण निवडणूक रिंगणात आहेत. दरम्यान सोमवारी अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी तळोदा पंचायत समितीच्या आवारात उमेदवार व त्यांचे समर्थक उपस्थित होते. तालुक्यात एकही ग्रामपंचायत बिनविरोध झालेली नसल्याची माहिती आहे.