शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
3
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
6
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
7
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
8
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
9
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
10
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
11
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
12
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
13
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
14
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
15
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
18
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
19
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
20
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कामाच्या बळावर निवडून येते, कुणा प्रतिस्पर्धीची मला चिंता नाही- खासदार हिना गावीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:31 IST

नंदुरबार : देशातील टॅापटेन खासदाराला आणि दुसऱ्या वेळी सहा वेळा आमदार राहिलेल्या लोकप्रतिनिधीला मी हरवले आहे. त्यामुळे कुणी अधिकारी ...

नंदुरबार : देशातील टॅापटेन खासदाराला आणि दुसऱ्या वेळी सहा वेळा आमदार राहिलेल्या लोकप्रतिनिधीला मी हरवले आहे. त्यामुळे कुणी अधिकारी आपला राजकीय प्रतिस्पर्धी कसा होऊ शकेल, आणि झालेच तर आपण आणि आमदार डॅा. विजयकुमार गावीत यांच्या कामाच्या बळावर निवडून येते आणि येत राहणार, असा ठाम विश्वास व्यक्त करीत माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या तक्रारींची चौकशी होऊ नये यासाठीच रघुवंशी जिल्हाधिकारी यांचे गुणगान करीत असल्याचा आरोपही खासदार डॉ. हिना गावीत यांनी पत्रकार परिषदेत केला.

माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी खासदार डॉ. हिना गावीत व आमदार डॉ. विजयकुमार गावीत यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी सायंकाळी खासदार डॉ. हिना गावीत यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितले, जिल्हाधिकारी यांना आपण राजकीय प्रतिस्पर्धी मानत नाहीत. जर एक युवती टॉपटेन खासदाराला, सहा वेळा आमदार राहिलेल्या नेत्याला केवळ विकास कामांच्या बळावर हरवू शकते तर इतरांचे आव्हान काय आणि कसे राहील याचा विचार आपण करीत नाही. जिल्हाधिकारी यांच्यावर आपण वैयक्तिक टीका करीत नाहीत, त्यांच्या कार्यपद्धतीवर टीका करीत आहोत. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे जिल्ह्यात कोरोना वाढला आहे हेच आपण सांगत आहोत. त्यांच्या बेकायदेशीर कामांवर बोट ठेवत आहोत. आम्ही वर्षानुवर्षापासून येथे राजकारण, लोकसेवा करीत आहोत, दीड-दोन वर्षांपूर्वी आलेल्या अधिकाऱ्याने आम्हाला सल्ले देऊ नयेत, असेही त्यांनी सांगितले. चंद्रकांत रघुवंशी यांचे फार्महाऊस प्रकरण व इतर तक्रारींसंदर्भात जिल्हाधिकारी यांनी नरमाईची भूमिका घ्यावी यासाठीची रघुवंशी हे जिल्हाधिकारी यांची बाजू उचलून धरत असल्याचा आरोप त्यांनी केला.

रेमडेसिविर इंजेक्शन वाटपाबाबत बोलतांना त्यांनी सांगितले, आपल्याकडे दवाखाना नाही, औषधी विक्रीचे लायसन्स नाही, त्यामुळे मला थेट रेमडेसिविर कोण आणि कसे देणार. ज्या दवाखान्यांना लागले त्यांना ते उपलब्ध व्हावे यासाठी आपण वजन वापरून संबधितांना सांगितले व त्या माध्यमातून रेमडेसिविर मिळवल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आम्ही दोन्ही बहिणी एम.डी.आहोत. आम्ही जिल्हा रुग्णालयात सेवा द्यावी अशी अपेक्षा रघुवंशी यांनी व्यक्त केली. परंतु मेडिकल कौन्सिलच्या नियमानुसार मला प्रॅक्टिस करता येणार नाही, औषधी लिहून देता येणार नाही. बहीण डॉ. सुप्रिया हिचे पेपर सुरू आहेत. ते संपल्यावर ती सेवेत दाखल होणार आहे. कुणाला प्रॅक्टिस करता येते याची माहिती रघुवंशी यांनी आपल्या मुलीकडून किंवा ज्यांचा उदोउदो करतात त्या जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती घेतली असती तर बरे झाले असते, असेही त्यांनी सांगितले.

आपण कुणाच्या मेहरबानीने नाही तर मेरिटवर डॉक्टर झालो आहोत. तसे सर्व रेकॅार्ड शासनाकडे आहेत. रघुवंशी यांच्या मुलीसारखे डोनेशन भरून वकील झालेलो नाहीत, असेही खासदार गावीत यांनी स्पष्ट केले.

आमदार डॉ. विजयकुमार गावीत यांच्यावर झालेले सर्व भ्रष्टाचाराच्या आरोपांना न्यायालयाने क्लीन चिट दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.