शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
5
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
6
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
7
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
8
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
9
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
10
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
11
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
12
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
13
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
14
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
15
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
16
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
17
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
18
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
19
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
20
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
Daily Top 2Weekly Top 5

रॉड तुटल्याने ट्रकची डंपर व मोटारसायकलींना धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 12:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील लोणखेडा गावालगत शर्मा हॉटेलसमोर सोमवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास ट्रकच्या पुढील चाकाचे रॉड ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील लोणखेडा गावालगत शर्मा हॉटेलसमोर सोमवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास ट्रकच्या पुढील चाकाचे रॉड तुटून चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने समोर असलेल्या डंपरसह दोन मोटारसायकली व एक ठेला गाडीला धडक दिल्याने वाहनांची मोडतोड झाली. या अपघातात जिवीतहानी झाली नसली तरी एका मोटारसायकलचा चुराडा झाला.सोमवारी रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास खेतियाकडून शहाद्याकडे येणाऱ्या ट्रकने (क्रमांक एम.पी.०९- एचजी ४२६०) लोणखेडा चौफुलीलागत असलेल्या शर्मा रेस्टारंटसमोर उभा असलेला डंपर (क्रमांक एम.एच.०४ ईएल-०९१२) रस्त्याच्या बाजूला उभा होता. त्याच्या पाठीमागे एक आमलेट व नाश्त्याची हातगाडीसह दोन मोटरसायकली उभ्या होत्या. या ट्रकचे पुढील चाकाचे रॉड तुटल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने डंपरसह मोटारसायकल व हातगाडीला धडक दिली. यात वाहनांसह हातगाडीचे नुकसान झाले. याबाबत शहादा पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद करण्यात आली आहे.