शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

दरडी कोसळल्याने वाहतूक विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 12:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : तळोदा ते धडगाव दरम्यान असणा:या चांदसैली घाटात आठवडय़ाभरापासून सुरू असणा:या पावसामुळे दरडी कोसळण्यास सुरुवात ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : तळोदा ते धडगाव दरम्यान असणा:या चांदसैली घाटात आठवडय़ाभरापासून सुरू असणा:या पावसामुळे दरडी कोसळण्यास सुरुवात झाली आहे. दरडी कोसळल्यामुळे घाटमार्गात दगड-माती पसरल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.चांदसैली घाट हा सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात धोकेदायक घाट म्हणून प्रसिध्द आहे. दरवर्षी पावसाळ्यात या घाटात मोठय़ा प्रमाणात दरडी कोसळण्याची समस्या निर्माण होत असते. गेल्या आठवडय़ाभरापासून सातपुडय़ाच्या पर्वत रांगेत पाऊस हजेरी लावत आहे.  पावसामुळे चांदसैली घाटात नेहमीप्रमाणे दरडी कोसण्यास सुरुवात झाली आहे. याचा परिणाम  घाटातील वाहतुकीवर झाला आहे. तीव्र चढाव व उतारावर दरडी कोसळल्यामुळे वाहनधारकांना  नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी शेतातील व रस्त्या शेजारील चारीची माती रस्त्यावर पसरल्याचे दिसून येत आहे. दरडी कोसळल्याने कोठार ते धडगाव रस्त्यावरील घाट मार्गात ठिकठिकाणी मोठय़ा प्रमाणात दगड व मातीचा खच पसरला आहे. जोपयर्ंत मोठी दरड कोसळून घाटमार्गातील वाहतूक पूर्णपणे ठप्प होत नाही तोर्पयत लहान-लहान कोसळलेल्या दरडीचे दगड व मातीदेखील हटविण्यात येत नाही. या रस्त्यात वाहतुकीला अडथळा ठरणारे लहान-मोठे दगड अपघात घडू नये म्हणून अनेकदा वाहनधारकच आपली वाहने उभी करून हटवितांना दिसून येतात. रस्त्यावरील दगड व माती वेळीच न हटविल्याने पावसाच्या               सुरू असलेल्या रिपरिपमुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.नागमोडी वळणे, खोल दरी, अरुंद रस्ता यामुळे चांदसैली घाटत वाहन चालकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यातच रस्त्यावर दरडी कोसळल्यामुळे पसरलेल्या दगड, माती व चिखलामुळे घाटातील वाट अधिकच बिकट  बनली आहे. तीव्र चढाव व उतारावर असणारा चिखल हा अपघाताला निमंत्रण देणारा ठरू पाहात आहे. या चिखलामुळे दुचाकी स्लिप होण्याचे प्रमाण वाढले आहे तर चारचाकी वाहनांनादेखील अडचणींना सामोरे जावे लागत आहे.पावसाळा सुरू होण्यापूर्वी घाट मार्गात प्रशासनाकडून दरडी कोसळू नयेत म्हणून थातुरमातुर उपाययोजना करण्यात येतात. मात्र पहिल्याच पावसाळ्यात या उपाययोजनांची पोलखोल झालेली दिसून येत आहे. दरम्यान, घाटात दरडी कोसळल्यामुळे रस्त्यावर पसरलेले दगड व माती तात्काळ हटवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी घाटामार्गात पावसाळ्यात कायमस्वरूपी एक जेसीबी प्रशासनाकडून तैनात असायला  हवे. जेणे करून घाटात दरड कोसल्यास ती त्वरित रस्त्याच्या बाजूला करण्यास मदत होऊन या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू राहील.