शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची रिपरिप; आणखी पाच दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:32 IST

जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात दमदार आणि पेरणीलायक पाऊसच झाला नव्हता. त्यामुळे ४० टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरण्याच झालेल्या नव्हत्या तर यापूर्वी ...

जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात दमदार आणि पेरणीलायक पाऊसच झाला नव्हता. त्यामुळे ४० टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरण्याच झालेल्या नव्हत्या तर यापूर्वी पेरणी झालेल्या क्षेत्रातील पिके वाया जाण्याची भीती होती. आणखी आठ दिवस पाऊस आला नसता तर पिकं करपून वाया गेली असती. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे मात्र पिकं वाचली असून, उर्वरित क्षेत्रातदेखील पेरणी होण्यास आता मदत होणार आहे. अर्थात पावणेदोन महिने वाया गेले आहेत. आता जे पीक येईल त्यावर समाधान मानून उर्वरित क्षेत्रात पेरणीसाठी शेतकरी सज्ज झाला आहे. पावसाने उघडीप दिल्यास आणि जमिनीत वाफसा निर्माण झाल्यास लागलीच पेरण्यांना सुरुवात होणार आहे.

गेल्या पाच दिवसांपासूनच्या पावसामुळे मात्र जिल्ह्यातील अनेक नदी-नाले प्रवाही होण्यास सुरुवात झाली आहे. पावसाची अशीच संततधार राहिल्यास जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठ्यातदेखील वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे निर्माण झालेले संकट दूर होण्याची आशा व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील पहाडी क्षेत्रात अधिक आहे. त्यामुळे डोंगर उतारावरून येणाऱ्या नाल्यांमुळे सपाटीवरील नद्या व नालेही प्रवाही होत आहेत.

दरम्यान, कृषी विज्ञान केंद्राच्या जिल्हा कृषी हवामान केंद्रातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार येत्या पाच दिवसात जिल्ह्यातील सर्वच भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. शेतजमिनीत योग्य वाफसा झाल्यानंतरच पेरणी करावी, असाही सल्ला या केंद्रातर्फे देण्यात आला आहे.