शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
3
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
4
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
5
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
6
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
7
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
8
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
9
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
10
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
11
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
12
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
13
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
14
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
15
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
16
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
17
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
18
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
19
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये घरगुती कामांना आला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:32 IST

ब्राह्मणपुरी : सध्याच्या लॉकडाऊनमध्ये नागरिक हतबल झाले आहेत. हाताला काम नसल्याने त्यांच्यातील अस्वस्थता वाढीस लागली आहे. अशा काळात ग्रामीण ...

ब्राह्मणपुरी : सध्याच्या लॉकडाऊनमध्ये नागरिक हतबल झाले आहेत. हाताला काम नसल्याने त्यांच्यातील अस्वस्थता वाढीस लागली आहे. अशा काळात ग्रामीण भागातील नागरिकांनी, महिला वर्गाने पावसाळापूर्व कामाला प्राधान्य देऊन बरीचशी कामे धसास लावली आहेत. यात पापड लाटणे, खारोड्या, कुरवड्या, शेवया याबरोबरच मसाला कुटणे, पावसाळ्यात सरपणाची सोय करणे, शेतीची मशागत करणे, आदी कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत.

लॉकडाऊनमध्ये पुरुष मंडळी घरीच असल्याने, यावेळी वरील कामांसाठी महिलांना पुरुषांचीही मदत मिळत आहे. लॉकडाऊनमध्ये काही महिलांनी पावसाळापूर्व कामे पूर्ण केली आहेत. मेचा उन्हाळा कडक असतो. साहजिकच, या महिन्यात पापड, खारोड्या, कुरवड्या सुकविण्यासाठी चांगले ऊन असते, तसेच मसाला कुटण्याआधी लाल मिरची उन्हातच सुकवून, मग ती कुटण्यासाठी मसाला गिरणीत दिली जाते. त्या व्यतिरिक्त आदिवासीबांधव पावसाळ्यात सरपणाची सोय व्हावी, यासाठी रानात जाऊन सरपण गोळा करून आणत आहेत. शेतीच्या मशागतीलाही वेग आला आहे.

लॉकडाऊनमुळे मजूर मिळत नसल्याने अद्याप शेतीच्या मशागतीची कामे थंडावली आहेत. यंदा मजुरांची वानवा असल्याने या समाजाला शेतीच्या मशागतीसाठी मोठा फटका बसल्याचे दिसून आले आहे. आदिवासी बांधव दरवर्षी उन्हाळ्यात रानातील रानमेवा बाजारात विकण्यासाठी आणतात. परंतु, लॉकडाऊनमध्ये यंदा सर्वत्र पाणी फिरले गेले आहे.

कोरोनाने हिरावून घेतली संधी

यंदा ऐन व्यवसायाच्या हंगामात रानमेवा बाजारात कोरोनामुळे येऊ न शकल्याने, कित्येक आदिवासी नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मासेमार करणाऱ्या समाजालाही यावेळी फटका बसला. तसेच बाजार हाटवर अवलंबून असलेल्या समाजालाही लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. या एप्रिल व मे महिन्यांत चांगला व्यवसाय करण्याच्या अनेक संधी असतात. मात्र, या संधीच कोरोनाने हिरावून घेतल्याने स्थानिक नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.