शहरं
Join us  
Trending Stories
1
Prateek Yadav: मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांचं वयाच्या ३८ व्या वर्षी निधन
2
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा 'बुलडोजर'
3
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
4
विशेष लेख: नरेंद्र मोदी-अमित शाह यांचे पुढचे लक्ष्य?- अर्थातच पंजाब!
5
NEET Paper Leak: कॉमा-फुलस्टॉपसह प्रश्न जसेच्या तसे; नीट-२०२६च्या ‘गेस पेपर’ने खळबळ; एका पेपर लीकमधून १०० कोटींची उलाढाल
6
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२६,आर्थिक लाभ होऊ शकतात, नवीन कामाची सुरूवात आज करा
7
अग्रलेख: ‘नीट’ फेरपरीक्षेचा वरवंटा! लाखो विद्यार्थ्यांची स्वप्ने चिरडली जाणार
8
IPL 2026 Points Table: क्वॉलिफायर १ चे दोन प्रबळ दावेदार; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चढाओढ
9
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
10
विशेष लेख: स्वतंत्र, सतर्क, सक्रिय वकील हा लोकशाहीचा कणा!
11
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
12
पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर
13
NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार
14
काळजी घ्या! महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट, कोकणालाही बसणार चटके
15
मुंबईतील सर्वोदय को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना आरबीआयकडून रद्द, ठेवीदारांच्या पैशाचे काय होणार?
16
विरारमध्ये दिवसाढवळ्या थरार! अज्ञातांच्या भीषण हल्ल्यात आरटीआय कार्यकर्ता ठार, मंडल अधिकारी जखमी
17
Sangli: वादळात मंदिराची भिंत कोसळली, दगडांखाली दबून ६ भाविक ठार, आठ जखमी
18
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
19
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
20
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याच्या आरोग्याची सुरू झाली तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 12:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा दाैर्यावर आलेल्या आरोग्य सेवा संचालनालयाच्या २८ संचालक दर्जाच्या अधिकार्यांनी बुधवारी ३२ प्राथमिक आरोग्य ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा दाैर्यावर आलेल्या आरोग्य सेवा संचालनालयाच्या २८ संचालक दर्जाच्या अधिकार्यांनी बुधवारी ३२ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि दोन ग्रामीण रुग्णालयांची पाहणी केली. प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने आरोग्य विभागाचे अधिकारी दाखल झाले असल्याने जिल्ह्याची आरोग्य तपासणी सुरू असल्याचे चित्र सकाळपासून निर्माण झाली होती.        
आरोग्य संचालक डाॅ. अर्चना पाटील यांच्या नेतृत्त्वात रविंद्र शेळके, डाॅ. सतीष पवार, डाॅ. नितीन अंबाडेकर, डाॅ. विजय कंदेवाड, डाॅ. फारुखी, डाॅ. पटनशेट्टी, डाॅ. उमेश शिरोडकर, डाॅ. अरुण यादव, डाॅ. एस.पी.सूर्यवंशी, डाॅ. सतीष डोईफोडे,  डाॅ. जाधव, डाॅ. गोविंद चाैधरी, डाॅ. नितीन भालेराव, डाॅ. एस.जी.काळे, डाॅ. दुर्योधन चव्हाण, डाॅ. राजेश कतरे, डाॅ. देशपांडे, डाॅ. ब्रह्मानंद, डाॅ. वाकचाैरे, डाॅ. नागेश गाडेकर, डाॅ. प्रकाश पाडवी आदी २८ संचालक, सहसंचालक व उपसंचालक दर्जाचे अधिकारी जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी जिल्ह्यात दाखल झाले होते. बुधवारी सकाळी धडगाव, नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा आणि नंदुरबार तालुक्यात या अधिकार्यांनी भेटी दिल्या. यात प्रामुख्याने तीन अधिकार्यांचे एक पथक रवाना झाले होते. प्रामुख्याने धडगाव आणि अक्कलकुवा या दोन तालुक्यावर विशेष नजर ठेवत आरोग्य संचालक डाॅ. अर्चना पाटील यांच्यासह १२ वरिष्ठ अधिकारी रवाना झाले. त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयातील सोयी सुविधांचा आढावा घेण्यासाेबतच उपकेंद्र व गर्भवती मातांच्या भेटी घेतल्या. या पथकांकडून भेटीचे लाईव्ह रिपोर्टींग सुरू असून रुग्ण, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका, आशा, अंगणवाडी सेविका यांच्यासोबत साधल्या गेलेल्या संवादाच्या नोंदी घेण्यात आल्या. 

या आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयांना दिल्या भेटी 
अधिकार्यांनी धडगाव तालुक्यातील चुलवड, तलाई, धनाजे, तेलखेडी, झापी, रोषमाळ, कात्री, अक्कलकुवा तालुक्यातील मांडवा, काठी, डाब, उर्मिलामाळ, होराफळी, ब्रिटीश अंकुश विहिर, खापर, ओहवा, तळोदा तालुक्यातील सोमावल, बोरद, नवापूर तालुक्यातील प्रतापपूर, झामणझर, वावडी, पळसून, डोगेगाव, नंदुरबार तालुक्यात शनिमांडळ, कोपर्ली, नटावद, शहादा तालुक्यात कुसुुमवाडा, पाडळदा, कलसाडी, शहाणा, वाघर्डे, पुरूषोत्तमनगर आणि मंदाणा आरोग्य केंद्राना भेटी दिल्या. या भेटीदरम्यान पथकांनी अक्कलकुवा व खांडबारा ता. नवापूर येथील ग्रामीण रुग्णालयांना भेटी देत सुविधांचा आढावा घेतला. 

संचालक अर्चना पाटील यांची अतीदुर्गम भागात भेट  
आरोग्य संचालक डाॅ. अर्चना पाटील यांनी बुधवारी सकाळी तोरणमाळपासून पुढे असलेल्या झापी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणार्या कुंड्या येथील आरोग्य उपकेंद्राला भेट दिली. याठिकाणी त्यांनी माता व कुपोषित बालकांची तपासणी करुन चर्चा केली. मातांना जाणवणार्या समस्या तसेच कुपोषण निर्मुलनासाठी चालवण्यात येणार्या कार्याचा आढावा त्यांनी घेतला. धडगाव तालुक्यातील तलाई, अक्कलकुवा तालुक्यातील ब्रिटीश अंकुशविहिर या आरोग्य केंद्रांच्या उपकेंद्रांना भेटी देत अधिकार्यांनी कुपोषित बालकांच्या पालकांच्या भेटी घेत त्यांच्या नोंदी घेतल्या आहेत. मातृवंदना योजनेसारख्या वैयक्तिक लाभाच्या योजना कशाप्रकारे राबवल्या जात आहेत याची माहिती वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सेविका यांच्याकडून घेण्यात आली.