तळोद्यात गरजूंना जीवनावश्यक वस्तू वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 12:42 PM2020-04-01T12:42:35+5:302020-04-01T12:42:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : शहरातील हातावर पोट भरणाऱ्या मजुरांंवर लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना शहरातील स्वयंसेवी संस्था, ...

Distribution of essential commodities to the needy in the basement | तळोद्यात गरजूंना जीवनावश्यक वस्तू वाटप

तळोद्यात गरजूंना जीवनावश्यक वस्तू वाटप

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : शहरातील हातावर पोट भरणाऱ्या मजुरांंवर लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना शहरातील स्वयंसेवी संस्था, राजकीय पदाधिकारी, तरुणांकडून मदत केली जात असून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा झाल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन असल्याने मजुरांना कामावर जाणे अवघड झाले आहे. विशेषत: ज्यांचे हातावर पोट भरते त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर तळोदा शहरातील तरुणांचे काही सामाजिक ग्रुप, राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात त्यांना अन्न, धान्याचे पाकीट, भाजीपाला, किराणा माल देऊन मदत करीत आहेत. आमदार राजेश पाडवी हे स्वत: शेजारच्या गुजरात राज्यात व नाशिक जिल्ह्यात रोजगारासाठी स्थलांतरीत झालेल्या मजुरांची वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना वाहनाची व्यवस्था करुन आपआपल्या गावाकडे रवाना करीत आहेत.
भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ.शशिकांत वाणी यांनीही शहरातील गरीब, निर्वासीत वस्तीत पीठ, दाळ, तांदूळ व इतर जीवनावश्यक वस्तू वाटप केल्या. या वेळी प्रा.विलास डामरे, गुलाबराव चव्हाण, जगन्नाथ मराठे, अभिषेक मालपुरे, अंबालाल साठे, भीमा महाले, भूषण येवले आदी उपस्थित होते. तसेच अक्कलकुवा तालुक्यातील जांबीपाणी या दुर्गम भागातील गावात डॉ.वाणी यांच्याकडून गावातील १५२ कुटुंबाना प्रत्येकी पाच किलो गव्हाचे पीठ व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मृतीदिनी संपूर्ण शहरात १० हजार साबण व मास्क वाटप केले. उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, भाजपचे शहराध्यक्ष योगेश चौधरी, नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, संदीप परदेशी, पालिका सभापती अंबिका शेंडे यांनी नागरिकांना सुरक्षेसाठी मास्क उपलब्ध करून दिले. तरुणांच्या सोशल ग्रुपतर्र्फेे फुटपाथवरील बेघर असलेल्यांना रोज दोन्ही वेळचे जेवण व गरजूंना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यात येत आहेत. शहरात अनेक हात गरीबांच्या मदतीसाठी सरसावल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

Web Title: Distribution of essential commodities to the needy in the basement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.