शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

सापडलेल्या दागिन्याच्या रकमेतून गरजुंना शिधा वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:30 IST

तळोदा - येथील एका व्यावसायिकास सापडलेल्या दागिन्यातून आलेल्या रकमेचे डाळ, तांदूळ, मिरची, तेल आदी वस्तू खरेदी करून धडगाव ...

तळोदा - येथील एका व्यावसायिकास सापडलेल्या दागिन्यातून आलेल्या रकमेचे डाळ, तांदूळ, मिरची, तेल आदी वस्तू खरेदी करून धडगाव तालुक्यातील २३ सिकेलसेलग्रस्त कुटुंबांना त्याचे वाटप केले. तलोद्यातील अन्न छत्र परिवाराच्या माध्यमातून ही मदत पोहोचविण्यात आली. कोरोना महामारीमुळे उपासमारीस तोंड देत असलेल्या या कुटुंबांनी समाधान व्यक्त केले आहे.

तळोदा शहरातील योगेश वाणी हे काही दिवसांपूर्वी हनुमान मंदिरात दर्शनासाठी जात होते. रस्त्यात त्यांना दागिना सापडला. ज्याचा असेल त्याला परत देण्यासाठी वाटदेखील पाहिली. मात्र कोणीच आले नाही. शेवटी त्यांनी गावातीलच एका सोनाराकडे त्याची मोड घातली. त्यातून आलेली रक्कम त्यांनी शहरातील अन्न छत्र परिवाराच्या कार्यकर्त्यांकडे स्वाधीन केली. साधारण पाच हजार रुपये त्यातून आले होते. या रकमेतून गरीब कुटुंबांना धान्य स्वरूपात मदत करण्याचे त्यांनी परिवाराच्या कार्यकर्त्यांना सांगितले होते. अन्न छत्र परिवारातील कार्यकर्त्यांनी आपल्या मित्रांच्या माध्यमातून सिकलसेलग्रस्त कुटुंबांचा शोध घेतला. त्यांनी पन्नास कुटुंबांची यादी परिवारास पाठवली. त्यानुसार संतोष माळी, पुतन दुबे या कार्यकर्त्यांनी साधारण पावणेदोन क्विंटल माल एका वाहनाने धडगाव तालुक्यातील या कुटुंबांना रवाना केला. त्यांना तो माल वाटपदेखील करण्यात आल्याचे या कार्यकर्त्यांनी सांगितले. ऐन कोरोना महामारीच्या काळात रोजगारापासून उपेक्षित असलेल्या कुटुंबांना आधार मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

चौकट....

उर्वरित कुटुंबांनादेखील मदत देणार

तळोदा शहरातील अन्न छत्र परिवारातील हे दोन्ही कार्यकर्ते गेल्या वर्षभरापासून समाजातील गरीब, घटकांसाठी अन्न-धान्याची मदत करीत आहेत. ज्या ठिकाणी लग्न व इतर कार्य असेल तेथून शिल्लक राहिलेले अन्न गरजूंना देत असतात. कोरोना महामारीत तर त्यांनी दानशुरांच्या आर्थिक सहकार्यातून धान्य व वस्तू दिल्या होत्या. आताही त्यांचे कार्य सलग सुरूच आहे. व्यावसायिकाने दिलेल्या रकमेतून त्यांनी २७ सिकेलसेलग्रस्त कुटुंबांना मदत दिली. उर्वरित कुटुंबांनादेखील मदत देणार आहोत, असे कार्यकर्त्यांनी सांगितले.

कोट....

शहरातील एका दुकानदाराने सापडलेल्या दगिन्यातून आलेली रक्कम कोरोना काळात अपेक्षित असलेल्या कुटुंबांना धान्य स्वरूपात मदत देण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे या रकमेतून पावणेदोन क्विंटल माल आला होता. लगेच धडगाव तालुक्यातील गरजू कुटुंबांना रवाना केला. - योगेश वाणी, दुकानदार.