शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
5
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
6
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
7
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
8
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
9
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
10
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
11
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
12
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
13
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
14
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
15
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
16
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
17
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
18
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
19
युद्धाचा फटका: रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या बोकांडी, दरात १०.८४ ते ८५.७१ टक्क्यांची वाढ
20
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांना तक्रारींसाठी स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष नसल्याने नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 13:48 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : दिव्यांगांच्या शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे, शिवाय त्यांना तक्रार करता यावी म्हणून शासनाने विभागीय ...

 लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : दिव्यांगांच्या शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे, शिवाय त्यांना तक्रार करता यावी म्हणून शासनाने विभागीय स्तरापासून ग्राम पातळीवर स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले आहे. तथापि अजूनही असे कक्ष स्थापण्याबाबत प्रशासनात उदासीनता दिसून येत आहे. त्यामुळे अपंगांच्या योजनांविषयी प्रशासन नेहमी दिरंगाई करत असल्याचा त्यांचा आरोप असून, या प्रकरणी कडक तंबी देण्याची दिव्यांगांकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.           राज्य शासनाने समाजातील दिव्यांगांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. परंतु स्थानिक पातळीपासून तर वरिष्ठस्तरापर्यंत प्रशासन योजना प्रभावीपणे राबवित नाही. त्यामुळे त्यांना लाभदेखील योग्य प्रकारे मिळत नाही. परिणामी शासनाच्या योजनांना प्रतिसाद मिळत नाही. योजना अयशस्वी होतात. या पार्श्वभूमीवर दिव्यंगांच्या संघटनांमार्फत शासनाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारीही करण्यात आल्या आहेत. या तक्रारींची दखल घेवून आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनाच्या दिवशी दिव्यांगांना भेट म्हणून शासनाने त्यांच्या योजनांची प्रभावी अंमबजावणीसाठी व त्यांना तक्रार करता यावी म्हणून शासनाने विभागीय पातळीपासून ग्राम पंचायत स्तरापर्यंत तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच यावर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशदेखील देण्यात आले आहेत. परंतु याबाबत सबंधित प्रशासन सकारात्मक दिसून येत नसल्याचे चित्र आहे. कारण सरकारने आदेशकाढून आठ, १० दिवस झाले तरीदेखील अजून पावेतो कार्यवाही झाली नसल्याचे दिव्यांगांचे म्हणणे आहे. वास्तविक सरकारने त्यांच्या योजनेत पारदर्शी पणा आणून त्यांना लगेच लाभ मिळावा या शुध्द हेतूने विभागीय स्तरावर तक्रार निवारण अधिकारी म्हणून उपयुक्त, जिल्ह्यावर जिल्हा परिषदेचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी, तालुका लेवलवर गट विकास अधिकारी तर ग्राम पंचायतीवर ग्रामसेवक अशी नियुक्ती केली आहे. असे असताना त्यांच्याकडून योजनांबाबत नेहमीच उदासीन व नकारात्मक भूमिका घेतली जात असते. कारण यापूर्वीही शासनाने त्यांच्यासाठी पालिका व ग्राम पंचायतीने त्यांच्या एकूण उत्पन्ना पैकी पाच टक्के निधी खर्च करण्याची सक्ती केली आहे. मात्र या विषयी काही पालिका व ग्रामपंचायत वगळता जिल्ह्यात फारसे प्रयत्न होताना दिसत नाही. त्यांच्याकडून सातत्याने स्थानिक महसूल अधिकारी, जिल्हा परिषद प्रशासन यांच्याकडे तक्रारीदेखील केल्या जात असतात. तरीही गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. त्यामुळेच खालच्या स्तरावरील कर्मचारी कानाडोळा करीत असतात. एवढेच नव्हे ते योजनांसाठी सबंधितांकडे सतत थेटे घालत असतात. तथापि त्यांची तेवढ्या पुरता बोळवणी करून वेळ मारून नेली जात असते. त्यामुळे शासनाने जरी हा निर्णय घेतला असला तरी त्याची कडक अमलबजाणीसाठी ठोस कार्यवाही करून दर महिन्याला त्याचा आढावा घेवून सबंधित अधिकाऱ्यांनीच जबाबदारी निश्चित केली पाहिजे. अन्यथा शासनाने असे कितीही आदेश काढले तरी त्याला हरताळ फासण्याचे काम सुरूच राहील.

जिल्ह्यात १२ हजार दिव्यांगनंदुरबार जिल्ह्यात साधारण १२ हजार दिव्यांग आहेत. तथापि त्यांना अजूनही शासनाकडून आपल्यासाठी कोणत्या योजना आहेत याची माहिती नाही. त्यामुळे ते लाभ घेण्यासाठीदेखील पुढे येत नसल्याचे म्हटले जात आहे. वास्तविक केंद्र शासनाने त्यांच्यासाठी दिव्यांग अधिनियम लागू केला आहे. साहजिकच त्यांना त्यांचा हक्क, अधिकाराची जाणीव करून देणे हे देखील प्रशासनाची जबाबदारी आहे. प्रशासनाने त्यांच्या योजनांबाबत शहाराबरोबरच गाव पातळीवर जनजागृती केली पाहिजे. परंतु तसे होत नाही. उलट काही दिव्यांग व्यक्ती आपल्या कामासाठी कार्यालयाकडे सतत हेलपाटे मारत असतात. शासनाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये त्यांना चढण्यासाठी रॅम्पची व्यवस्था नाही, अशाही परिस्थितीत ते कसरत करत चढतात. त्यावेळी त्यांचे काम झाले नाही तर निराश होवून परतावे लागत असल्याची व्यथा त्यांनी बोलून दाखवली.

शासनाने दिव्यागांच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी व तक्रारीचे निरसन होणे करिता नुकताच तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला असला तरी त्याबाबत कडक कार्यवाही करण्यासाठी संबंधितांची जबाबदारी निश्चित करून आढावा घ्यावा. तरच शासनाचा हेतू सफल होवून दिव्यांगाना योजनांचा लाभ मिळेल. -मंगलचंद जैन, तळोदा तालुकाध्यक्ष प्रहार दिव्यांग संघटना,

शासनाने दिव्यागांच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी व तक्रारीचे निरसन होणे करिता नुकताच तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला असला तरी त्याबाबत कडक कार्यवाही करण्यासाठी संबंधितांची जबाबदारी निश्चित करून आढावा घ्यावा. तरच शासनाचा हेतू सफल होवून दिव्यांगाना योजनांचा लाभ मिळेल. -मंगलचंद जैन, तळोदा तालुकाध्यक्ष प्रहार दिव्यांग संघटना,