जिल्ह्यातील विविध भागात वैयक्तिक शाैचालयांचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:21 IST2021-02-19T04:21:33+5:302021-02-19T04:21:33+5:30

शाैचालयांच्या बाबतीत सर्वाधिक वाईट परिस्थिती ही धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील आहे. याठिकाणी गेल्या काही वर्षात २८ हजार १७७ तर ...

Disruption of personal toilets in various parts of the district | जिल्ह्यातील विविध भागात वैयक्तिक शाैचालयांचा बोजवारा

जिल्ह्यातील विविध भागात वैयक्तिक शाैचालयांचा बोजवारा

शाैचालयांच्या बाबतीत सर्वाधिक वाईट परिस्थिती ही धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील आहे. याठिकाणी गेल्या काही वर्षात २८ हजार १७७ तर अक्कलकुवा तालुक्यात ४३ हजार ९१ शाैचालयांचे बांधकाम गेल्या दोन वर्षात करण्यात आल्याची माहिती आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर बांधकाम केलेल्या शाैचालयांची मोठ्या प्रमाणावर दुर्दशा आहे. दुर्गम भागात आधीच पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याने शाैचालये पाण्याच्या टाक्यांविना बांधली गेली आहेत. यामुळे अनेक ठिकाणी पाणी नसल्याने अडचणी येत आहेत. या भागात लाभार्थींना ग्रामपंचायतींनी नियुक्त केलेल्या ठेकेदाराकडून शाैचालये बांधून दिल्याची माहिती देण्यात आली आहे. यात विटांचा वापर न करता सिमेंटच्या हलक्या दर्जाच्या फळ्या वापरल्या गेल्या होत्या. तसेच शाैचालयातील भांडेही हलक्या दर्जाचे असल्याने सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ शाैचालये टिकू शकलेली नाहीत. अक्कलकुवा तालुक्याच्या विविध भागात मोठ्या प्रमाणावर शाैचालयांची दुर्दशा दिसून येत आहे. दरम्यान तळोदा, शहादा, नंदुरबार आणि नवापूर येथे शाैचालयांचा वापर वाढला असल्याचे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात दिसून आले. वैयक्तिक शाैचालय किंवा मग शाैचालयाच्या छतावर टाक्या ठेवत काम पूर्ण करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

Web Title: Disruption of personal toilets in various parts of the district