शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल पाईपलाईनच्या बंद कामाचा निघेना तोडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 12:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : इंडियन आॅईल कंपनी व शेतकरी यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. यावर तोडगा काढण्यसाठी प्रशासनामार्फत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : इंडियन आॅईल कंपनी व शेतकरी यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. यावर तोडगा काढण्यसाठी प्रशासनामार्फत कंपनीचे अधिकारी व शेतकऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या हरकती डावलून कंपनीने काम सुरू केल्याचा आरोप करीत कामच बंद पाडले, परंतु त्यावर पुढे कुठलाही निर्णय, चर्चा अथवा कार्यवाही झाली नसल्याने अद्याप याचा तोडगा निघाला नाही.नवापूर तालुक्यातून जाणाºया प्रस्तावित पेट्रोलियम पाईपलाईनचे काम गुजरातपाठोपाठ नवापूर भागातही सुरु करण्यात आले होते. परंतु शेतकºयांना जमिनीचा अपेक्षित मोबदला दिला नाही, या लाईनमुळे शेतांना आग लागून नुकसान होण्याची शक्यता असे काही मुद्दे उपस्थित करीत या कामालाच विरोध केला. यावर तोडगा काढण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी महसुल विभागाने आदिवासी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी, इंडियन आॅईल कंपनीचे अधिकारी व यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. त्यावेळी शेतकºयांच्या शेतातील उभे पीक कापून इंडियन आॅइल कंपनीमार्फत अनधिकृतपणे पाईप लाईनचे काम केले जात असल्याचे आरोप करण्यात आले होते. शेतकºयांच्या जल, जंगल व जमीनीच्या मूळ हक्कावर गदा आणली जात असून या कामाला शेतकºयांच्या हरकती असतांना शेतकºयांना विश्वासात न घेता कंपनी आमच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न करत असल्याचे आरोपही करण्यात आले होते. कंपनी आमच्या जमिनीवर इतर हक्क प्रस्थापित करु पाहत आहे, परंतु हे आम्ही कदापी होऊ देणार नसल्याची भूमिका उपस्थित शेकडो शेतकºयांनी केला.तर हे काम त्वरित बंद करण्यात यावे अन्यथा संतप्त शेतकरी टोकाची भूमिका घेत विरोध करतील, असा इशाराही त्यावेळी देण्यात आला होता. शिवाय वेळप्रसंगी हक्कासाठी न्यायालयात दाद मागणार असल्याची भूमिका शेतकºयांनी घेतल्याने या बैठकीत हे काम बंद ठेवण्याचा निर्णय नवापूर तहसिलदार सुनिता जºहाड यांच्या उपस्थितीत घेण्यात आला होता. परंतु त्यावर अद्याप कुठलीही चर्चा अथवा निर्णय झाला नसल्यामुळे हे काम बंदच आहे. त्यावर तोडगा निघणे अपेक्षित असतांना कुठलीच चर्चा झाली नाही.पेट्रोलीयम पाईपलाईनचे काम हे काही वर्षांपासून प्रस्तवित होते. त्याला मंजूरी मिळाल्याने इंडियन आॅईल कंपनीमार्फत नवापूर तालुक्यातून पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू करण्यासाठी कंपनीमार्फत दोन वर्षांपूर्वीच कार्यवाही सुरू करण्यात आली. परंतू त्यात काही अडथळे निर्माण झाले असून हे दूर करीत काम मार्गी लावण्याची कार्यवाही सुरू झाली असली तरी शेतजमिनीच्या मोबदल्याबाबत समाधान झाले नाही. त्यामुळे पुन्हा वाद निर्माण झाला. सद्यस्थितीत हा वाद शिगेला पोहोचला असून शेतकºयांकडून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहे. परंतु त्यातही तोडगा निघाला नाही. त्यामुळे हे काम तुर्त बंद करण्याचे प्रशासनामार्फत सांगण्यात आले. त्यामुळे शेतकºयांचे समाधान करण्यासाठी प्रयत्न होणार आहे. त्याला काही कालावधी लोटणार असून पेट्रोलीयम पाईपलाईनचे हे कामही पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.