शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

विसरवाडी बाजारपेठेत निर्जंतुकीकरणाचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:29 IST

नवापूर तालुक्यातील विसरवाडी हे प्रमुख बाजारपेठ लाभलेले गाव असून परिसरातील ३५ ते ४० खेड्यापाड्यांचा दैनंदिन संपर्क येत असतो. ...

नवापूर तालुक्यातील विसरवाडी हे प्रमुख बाजारपेठ लाभलेले गाव असून परिसरातील ३५ ते ४० खेड्यापाड्यांचा दैनंदिन संपर्क येत असतो. सध्या कोरोना महामारीने सर्वत्र आहाकार माजवलेला असृन विसरवाडी येथे विविध कामानिमित्त तसेच येथील दवाखान्यात उपचारासाठी मोठ्या प्रमाणात रुग्ण येत आहेत. आरोग्य विभागाने रुग्णांची वाढती संख्या पाहता ग्रामीण भागातदेखील अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.

येथे बाहेरुन येणाऱ्यांमुळे स्थानिक ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून विसरवाडी ग्रामपंचायतीतर्फे गावात तसेच बाजारपेठेत निर्जंतुकीकरण करण्यात आले. यावेळी स्वतः सरपंच बकाराम गावित यांनी पुढाकार घेत स्वतः औषधांची फवारणी केली.

यावेळी ग्रामविकास अधिकारी कैलास सोनवणे, जयेश अग्रवाल, पंकज पवार, मयूर अग्रवाल, सफाई कर्मचारी मंगल डामरे, संदीप साळुंखे, प्रभू डामरे, विलास डामरे, यशवंत गावित, आदी उपस्थित होते.

दरम्यान, कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी मास्कचा वापर करावा, सामाजिक अंतर पाळावे, विनाकारण घराबाहेर पडू नये व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच बकाराम गावित यांनी यावेळी केले.

फोटो कॅप्शन- विसरवाडी येथील बाजारपेठेत निर्जंतुकीकरण करताना सरपंच बकाराम गावित व कर्मचारी वर्ग

बामखेडा येथे आंबेडकर यांची जयंती साजरी

शहादा : तालुक्यातील बामखेडा येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. सारंगखेडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेश शिरसाट यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला सरपंच मनोज चौधरी, माजी पोलीस पाटील ताराचंद गवळे, ग्रामपंचायत सदस्य जगन कापुरे, सामाजिक कार्यकर्ता विलास गवळे, अमृत गवळे व पत्रकार उपस्थित होते. सुशील गव्हाणे यांनी आभार मानले.