वर्षभरात 50 तक्रारींवर झाली ‘चर्चा’ : नंदुरबार लोकशाही दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 12:04 PM2018-02-07T12:04:44+5:302018-02-07T12:04:54+5:30

Discussion on 50 complaints over the year: Nandurbar Lokshahi Din | वर्षभरात 50 तक्रारींवर झाली ‘चर्चा’ : नंदुरबार लोकशाही दिन

वर्षभरात 50 तक्रारींवर झाली ‘चर्चा’ : नंदुरबार लोकशाही दिन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : प्रशासनातील अधिकारी आणि सामान्य नागरिक यांच्यात संवाद होऊन तक्रारींचा निपटारा करण्यासाठी सुरू केलेल्या लोकशाही दिनाकडे सामान्यच पाठ फिरवत आहेत़ परिणामी गेल्या वर्षात केवळ 50 तक्रारी येऊन त्यावर चर्चा करण्यात आली होती़        
फेब्रुवारी महिन्याचा लोकशाही दिन सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात झाला, याठिकाणी तब्बल 12 तक्रारी मांडण्यात आल्या़ जमिन, तंबाखूमुक्त अभियान, स्वच्छता आणि रोजगार या विषयांच्या तक्रारींवर चर्चा होऊन पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आल्या आहेत़ गेल्या वर्षात झालेल्या 50 तक्रारींवर केवळ चर्चाच झाल्याने नागरिक लोकशाही दिनी फिरकत नसल्याचे स्पष्ट होऊनही प्रशासन दखल घेत नसल्याने चांगल्या उपक्रमाची वाताहत सुरू झाली आह़े याउलट गेल्या वर्षात ऑनलाईन पोर्टलवर सातत्याने तक्रारी वाढल्या़  सोमवारच्या लोकशाही दिनात अपंग असलेल्या पाटील दाम्पत्यच्या तक्रारीवर बोलताना जिल्हाधिकारी डॉ़ एम़कलशेट्टी यांनी संबधित विभागाच्या अधिका:यांना कारवाई करण्याच्या सूचना केल्या़ या सूचना मिळाल्यानंतर ‘गेल्या’ लोकशाही दिनाप्रमाणेच त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत कारवाई करणार असल्याचे सांगितल़े हीच स्थिती इतरही तक्रारींबाबत दिसून आली़ यातील एका व्यक्तीने अनधिकृतपणे उघडय़ावर तंबाखू पुडय़ा बांधण्याच्या व्यवसायाला विरोध करत नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित केला होता़ संबधिताने कारवाई न झाल्याने सलग दुस:यांदा लोकशाही दिनात गा:हाणे मांडल़े 
एकीकडे लोकशाही दिनाला नागरिक येत नसताना दुसरीकडे ऑनलाईन तक्रारींचे प्रमाण मात्र वाढीस लागल्याचे गेल्या वर्षात दिसून आल़े जानेवारी ते डिसेंबर 2017 या कालावधीत शासनाच्या आपले सरकार या ऑनलाईन पोर्टलवर जिल्हाधिकारी कार्यालयाला 266 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या़ यात 248 तक्रारींचा निपटारा करण्यात आला़ तर उर्वरित 16 तक्रारी ह्या कारवाईसाठी पुढे पाठवण्यात आल्या आहेत़ त्यांच्यावर अद्याप कारवाई झालेली नसली तरी येत्या काही दिवसात त्यांच्यावर कारवाई होणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े दुर्गम भागात आपले सरकारबाबत जनजागृती होत असल्याचे सांगण्यात येत आह़े 
 

Web Title: Discussion on 50 complaints over the year: Nandurbar Lokshahi Din

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.