शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारकरांच्या पदरी यंदाही निराशाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 12:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रेल्वे अर्थसंकल्पात नंदुरबार विभागाची पुन्हा उपेक्षाच कमी करण्यात आली आहे. जी तरतूद करण्यात आली ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : रेल्वे अर्थसंकल्पात नंदुरबार विभागाची पुन्हा उपेक्षाच कमी करण्यात आली आहे. जी तरतूद करण्यात आली ती अगदीच किरकोळ स्वरूपाची आहे. नंदुरबारचा खत रँक पार्इंट, दुसरा पादचारी पूल, मॉडेल स्थानकाअंतर्गतची कामे, आरक्षणाची स्वतंत्र इमारत आणि व्हीआयपी प्रतिक्षालय यांच्यासाठी कुठलीही तरतूद करण्यात आलेली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.रेल्वे अर्थसंकल्प नुकताच सादर करण्यात आला. त्याची पुस्तिकाही प्रकाशीत करण्यात आली. त्यात नंदुरबारच्या दृष्टीने अगदीच किरकोळ तरतूद करण्यात आली आहे. सुरत- जळगाव दरम्यान जे छोटे पूल, बोगदे प्रस्तावीत आहेत ते सर्व सुरत व जवळच्या भागात आहेत. महाराष्टÑात त्यापैकी काहीही नाही. पाच रेल्वे गेटवर सुरक्षारक्षक आणि सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यापैकी तीन गुजरातमध्ये आणि दोन महाराष्टÑात अर्थात नंदुरबारलगत आहेत. या व्यतिरिक्त काहीही तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही.यंदाच्या अर्थसंकल्पाकडून रेल्वेच्या विविध बाबींसदर्भात कामांची अपेक्षा होती. मात्र, लोकप्रतिनिधी पाठपुरावा करण्यात अपयशी ठरल्याने त्याचा समावेश अर्थसंकल्पात झाला नाही. नंदुरबार रेल्वे स्थानक मॉडेल करण्याचे यापूर्वीच जाहीर झाले आहे. परंतु निधीची तरतूद होत नाही. सध्या हेरिटेजच्या नावाखाली काम सुरू आहे. परंतु सुविधा त्यात काहीही राहणार नाहीत हे स्पष्टच आहे. त्यामुळे मॉडेल स्थानकाचा निधीही नंदुरबारला या अर्थसंकल्पात मिळू शकला नाही. परिणामी यंदाही हे काम रखडणार हे स्पष्टच आहे.व्हीआयपी प्रतिक्षालय नसल्याने मोठी गैरसोय होते. ती मागणी देखील दुर्लक्षीत करण्यात आली आहे. सुरत-भुसावळ मार्गावर नंदुरबार हे मध्यवर्ती स्थानक असल्याने येथे जवळपास सर्वच प्रवासी गाड्यांना थांबा आहे. शिवाय येथून तिर्थक्षेत्र देखील जवळ आहेत. परिणामी मंत्री, खासदार, आमदार, राजकीय नेते, अधिकारी आणि व्हिआयपी यांचा कायमच येथे राबता असतो. परंतु रिटायरिंग रूम अर्थात व्हीआयपी प्रतिक्षालय नसल्याने मोठी अडचण होते. या मागणीकडेही या अर्थसंकल्पात दुर्लक्ष करण्यात आले आहे.आरक्षणासाठी स्वतंत्र इमारतीची मागणी आहे. येथे सर्वच गाड्यांना थांबा असल्याने येथे आरक्षणासाठी जिल्हाभरातून तसेच जिल्हाबाहेरील प्रवासी देखील येतात. परंतु तिकिट आरक्षणासाठी अगदीच कमी जागा आहे. नुनतीकरण करण्यात येणाऱ्या इमारतीत देखील जागा तेवढीच ठेवण्यात आली आहे. त्यामुळे स्वतंत्र इमारतीची मागणी आहे. परंतु अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेली नाही.