शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
2
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
3
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
4
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
5
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
6
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
7
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
8
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
9
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
10
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
11
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
12
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
13
Marathi News LIVE: पेट्रोल आणि डिझेल कमी वापरा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, ऑनलाइन शिक्षण सुरू करा; PM मोदींचे सलग दुसऱ्या आवाहन
14
"निवडणुका जिंकण्यासाठी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेची राखरांगोळी केली..."; काँग्रेसचा टोला
15
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
16
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
17
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
18
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
19
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
20
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

कोविड केंद्राला घाणीचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरासह तालुक्यातील सौम्य लक्षण आढळून आलेल्या कोरोना विषाणू बाधित रूग्णांवर उपचार करण्यासाठी व बाधितांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरासह तालुक्यातील सौम्य लक्षण आढळून आलेल्या कोरोना विषाणू बाधित रूग्णांवर उपचार करण्यासाठी व बाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना विलगीकृत करण्यासाठी मोहिदा येथील शासकीय वसतिगृहात कोविड सेंटरचीनिर्मिती करण्यात आली आहे. मात्र येथील दुरवस्था पाहता हे उपचार केंद्र की, नरक यातना केंद्र असा प्रश्न सहजपणे पडतो. संपूर्ण परिसरात घाणीचे साम्राज्य, उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वापरलेल्या पीपीई किटची योग्य विल्हेवाट न लावता सार्वजनिक ठिकाणी अस्ताव्यस्त फेकून देणे, अशा अनेक प्रकारांनी येथे उपचार घेणारे बाधित रूग्ण त्रस्त झाले आहे.
शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात सुमारे २५३ अपेक्षा अधिक बाधित रूग्ण आढळून आले असून, त्यापैकी १०० रूग्णांवर मोहिदा येथील कोविड सेंटरला उपचार सुरू आहे. शासकीय वसतिगृहातील चार इमारतींंपैकी एका इमारतीत रूग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना विलगीकृत करण्यात आले असून, दुसरºया इमारतीत बाधितांच्या संपर्कातील नागरिकांचे स्वॅबचे नमुने घेण्यात आले आहेत. परंतु अशाचा अहवाल प्राप्त झालेला नाही, अशा नागरिकांना ठेवण्यात आले आहे. उर्वरित दोन इमारतीमध्ये कोरोना बाधित अहवाल आला असला तरी काही रूग्णांमध्ये याची लक्षणे आढळून येत नाही तर काहींमध्ये सौम्य लक्षण आहे, अशा बाधितावर उपचार करण्याची सुविधा करण्यात आलेली आहे. सद्य:स्थितीत या चारही इमारतीमध्ये १०० पेक्षा अधिक नागरिकांना गेल्या दोन दिवसापासून ठेवण्यात आलेले आहे.
येथे बाधित रूग्णाला उपचाराची सुविधा असली तरी संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य आहे. विशेष म्हणजे बाधित रूग्णांवर उपचार करणाºया वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांना सुरक्षिततेसाठी पीपीई कीट देण्यात आले आहे. ठराविक कालावधीनंतर या कर्मचाºयांनी शासकीय नियमानुसार हे कीट बदलणे अपेक्षित असून, त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी असे जागतिक आरोग्य संघटना व शासनाचे आदेश असले तरी या सेंटरमध्ये या कर्मचाºयांकडून याची योग्य प्रमाणे अंमलबजावणी होत नाही. वापर झाल्यानंतर या परिसरातील सार्वजनिक जागेवर एका ठिकाणी खुल्या वातावरणात हे कीट टाकले जात असून, त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जात नाही. दररोज किमान मोठ्या संख्येने कितीतरी कीट येथे पडले असून, वाºयामुळे संपूर्ण इमारतीच्या परिसरात पसरले आहेत.

४दैनंदिन वापरानंतर संकलित होणारे मेडिकल वेस्ट याची नियमांनुसार विल्हेवाट लावणे बंधनकारक असतानाही या इमारतीत मेडिकल वेस्ट संकलनाची अथवा त्याची योग्य प्रकारे शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याची कुठलीच सुविधा उपलब्ध नाही परिणामी कोविड सेंटरला बाधितांवर उपचार केल्यानंतर जमा होणारे मेडिकल वेस्ट हे सार्वजनिक ठिकाणी टाकले जात असल्याने यातून परिसरात कोरोनाविषाणू संक्रमणाचा फैलाव होण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारली जात नाही

चारही इमारतीच्या परिसरामध्ये व बाहेरील भागात घाणीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात आहे. इमारतीच्या आत ज्या ठिकाणी बाधित रूग्णांवर उपचार सुरू आहे, अशा ठिकाणी कुठलीही स्वच्छता नाही. सर्वत्र मेडिकल वेस्ट गोळ्यांचे रॅपर व घाण पसरली आहे. परिणामी संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून, या वासामुळे येथे राहणाºयांना उलट्या मळमळ असा त्रास सुरू आहे. दररोज येथे स्वच्छता अथवा साफसफाई केली जात नाही, विशेष म्हणजे शासनाने कोविड सेंटरला आवश्यक त्या सर्व सुरक्षित साधनासह स्वच्छता कर्मचाºयांची नेमणूक करण्याचे स्पष्ट आदेश असतानाही याठिकाणी स्वच्छता कर्मचारी आढळून येत नाही. इमारतीच्या तिन्ही मजल्यांवर घाणीचे साम्राज्य कायम आहे.