शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या नोटीसीनंतरही हिशोब न मिळाल्यास थेट फाैजदारी गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 12:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या अक्कलकुवा ग्रामपंचायतीतील आर्थिक अनियमिततेसंदर्भात जिल्हा परिषद प्रशासनाने आजी-माजी सरपंच, ग्रामसेवक, प्रशासक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या अक्कलकुवा ग्रामपंचायतीतील आर्थिक अनियमिततेसंदर्भात जिल्हा परिषद प्रशासनाने आजी-माजी सरपंच, ग्रामसेवक, प्रशासक अशा ९ जणांविरोधात दुसऱ्यांदा नोटीस काढण्याची कारवाई पूर्ण केली आहे. पहिल्या नोटीसमध्ये केलेले खुलासे हे समाधानकारक नसल्याने जिल्हा परिषदेने दुसऱ्यांना नोटीस बजावली असून, योग्य ते उत्तर न मिळाल्यास फौजदारी कारवाई होणार आहे.दोन प्रशासक, दोन माजी सरपंच, एक उपसरपंच, एक ग्रामसेवक, दोन ग्रामविस्तार अधिकारी आणि विद्यमान सरपंच अशा ९ जणांना नोटीस देण्यात आल्या आहेत. एकूण चार कोटी ७५ लाख रुपयांच्या आर्थिक व्यवहारांचे हिशोब नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नोटीस बजावण्याची प्रथम कारवाई नोव्हेंबर महिन्यात करण्यात आली होती. २०१६ ते २०२० या काळात अक्कलकुवा ग्रामपंचायतीत लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर २०२०मध्ये तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गाैडा यांनी चार सदस्यीय समिती नेमून चाैकशी करण्याचे आदेश दिले होते. प्रथम दिलेला ३१ पानी अहवाल अपूर्ण असल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने पुन्हा नव्याने आढावा घेण्यास सुरुवात केली होती. १४वा वित्त आयोग आणि पाच टक्के पैसा निधी खर्च केल्याचा योग्य तो हिशोब नसल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले होते. ग्रामपंचायतीत ई-टेंडरींग न करताच रस्त्यांची व गटारींची कामे दर्शवली गेल्याचे यातून समोर आले होते. शहरातील अनेक भागात प्रत्यक्षात विकासकामे नसतानाही त्या नावाने रकमा काढल्या गेल्याचे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीतून समोर आल्यानंतर नोटीस बजावण्याची कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, गुरुवारी पंचायत समितीकडे सर्व ९ जणांच्या नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. नोटीस मिळालेल्या सर्व ९ जणांना आठ दिवसांच्या आत जिल्हा परिषदेकडे खर्च केलेल्या रकमेच्या पुराव्यासह म्हणणे मांडायचे असल्याची माहिती देण्यात आली आहे. नोटीसीला दिलेल्या उत्तरातून गैरव्यवहार झालेल्या चार कोटी ७५ लाख रुपये निधीचा ताळमेळ न बसल्यास पोलिसात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया होणार आहे.याबाबत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर राैंदळ यांना संपर्क केला असता, त्यांनी नोटीस पंचायत समितीकडे पाठवण्यात आल्या असून, दोन ते तीन दिवसात संबंधितांना त्या मिळणार आहेत. नोटीस मिळाल्याच्या आठ दिवसात संबंधितांनी थेट जिल्हा परिषद प्रशासनाकडे म्हणणे मांडायचे असल्याची माहिती दिली आहे.