शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
3
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
6
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
7
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
8
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
9
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
10
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
11
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
12
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
13
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
15
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
16
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
17
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
18
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
19
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
20
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
Daily Top 2Weekly Top 5

बालकामगार ठेवल्यास थेट गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 12:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बालकामगार प्रथा निमरुलनासाठी समाजातील प्रत्येक घटकांचा सहभाग आवश्यक असून जिल्ह्यातील धोकेदायक उद्योगांच्या ठिकाणी बाल ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बालकामगार प्रथा निमरुलनासाठी समाजातील प्रत्येक घटकांचा सहभाग आवश्यक असून जिल्ह्यातील धोकेदायक उद्योगांच्या ठिकाणी बाल कामगार आढळून आल्यास त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिले.जिल्ह्यात 7 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर या कालावधीमध्ये बाल कामगार प्रथेविरुध्द जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी सरकारी कामगार अधिकारी किशोर जोशी, पोलीस उप अधीक्षक सिताराम गायकवाड, महिला व बाल कल्याण विभागाचे जाधव, दुकान निरिक्षक रमेश शेळके, स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.जनजागृती मोहिम कालावधीत जिल्हा कार्यक्षेत्रातील बाल कामगार बहुलक्षेत्र निश्चित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील विटभट्टी मालकांकडून बालकामगार न ठेवण्याबाबत हमीपत्र लिहून घेतले जाईल. हॉटेल असोसिएशन, व्यापारी संघटना यांच्या बैठका, चर्चासत्रे आयोजित करुन बाल कामगार अधिनियमाबाबत माहिती देण्यात येईल. मुख्य बाजारपेठ, मोठी गावे, नगरपालिका क्षेत्र याठिकाणी रॅलीचे आयोजन करणे, सार्वजनिक ठिकाणी स्वाक्षरी मोहिम राबविणे, स्टीकर प्रदर्शित करणे, सर्व विभागात सामुहिक शपथ घेणे, स्वयंसेवी संस्था, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्या सहकार्याने अत्यअल्प उत्पन्न असलेल्या क्षेत्रामधील पालकांचे प्रबोधन करण्याचा उपक्रम देखील राबविण्यात येणार आहे. स्थानिक बोलीभाषेतून बालमजुरीच्या अनिष्ठ प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी प्रबोधन करण्यासह विविध उपक्रम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. भारुड यांनी    दिले. सरकारी कामगार अधिकारी यांनी जिल्ह्यातील नागरिकांसाठी त्यांच्या कार्यालयात टोल फ्री     क्रमांक कार्यान्वीत करुन त्यावर बालकामगार विषयी तक्रारी नोंदविण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन द्यावी.  बाल कामगार अधिनियम कायद्यान्वये ज्या आस्थापनेमध्ये 14 वर्षाच्या आतील बालकामगार आढळून येईल अशा आस्थापनेविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात यावी. सर्व संबंधित यंत्रणांनी आपआपसात समन्वय ठेवून मोहीम यशस्वी करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.