नवापूर येथे नैराश्यातून युवकाची विष प्राशन करून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:37 IST2021-07-07T04:37:47+5:302021-07-07T04:37:47+5:30

नवापूर पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनोज पाटील सोमवारपासून (दि. ५) दुपारी ३ वाजेपासून घरी कोणाला काही न सांगता निघून ...

Depressed youth commits suicide by consuming poison in Navapur | नवापूर येथे नैराश्यातून युवकाची विष प्राशन करून आत्महत्या

नवापूर येथे नैराश्यातून युवकाची विष प्राशन करून आत्महत्या

नवापूर पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनोज पाटील सोमवारपासून (दि. ५) दुपारी ३ वाजेपासून घरी कोणाला काही न सांगता निघून गेला. नातेवाइकांनी आजूबाजूला बराच शोध घेतला; परंतु कुठेही आढळून आला नाही. त्यानंतर मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास नवापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चरणमाळ घाटातील वनविभागाच्या चौकीजवळ विष प्राशन केलेल्या अवस्थेत जमिनीवर मृतदेह आढळून आला. जवळच एक कीटकनाशकाची बॉटल दिसून आली. सदर घटनेची माहिती परिसरातील ग्रामस्थांनी पोलिसांना कळवली. त्यानंतर घटनास्थळी पोलीस पोहोचले. युवकाचा फोटो काढून ओळख पटविण्यासाठी सोशल मीडियावर टाकल्याने सदर युवकाची ओळख पटली. पंचनामा करण्यात आला. त्यानंतर गुजर गल्लीतील मित्र परिवार व नातेवाइकांनी चरणमाळ घाटात जाऊन घटनास्थळी मोठी गर्दी केली. नवापूर उपजिल्हा रुग्णालयात शव विच्छेदनासाठी नेण्यात आले. यावेळी नातेवाइकांनी मोठा आक्रोश केला. नवापूर सार्वजनिक मराठी हायस्कूल येथील शिपाई विजय पाटील यांचे लहान बंधू होते. त्यांच्यावर संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. मनोज पाटील यांच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: Depressed youth commits suicide by consuming poison in Navapur