नंदुरबारमध्ये हद्दपार टायगरला पोलिसांनी केले जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 19:32 IST2023-04-05T19:31:45+5:302023-04-05T19:32:27+5:30
पोलिस सूत्रांनुसार, अजय पावरा यास जून २०२२ मध्ये दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते.

नंदुरबारमध्ये हद्दपार टायगरला पोलिसांनी केले जेरबंद
रमाकांत पाटील
नंदुरबार : हद्दपार असतानाही त्याचे उल्लंघन करीत जिल्ह्यात दाखल झाल्याने एकास अटक करून शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय ऊर्फ टायगर राजेंद्र पावरा (वय २२) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
पोलिस सूत्रांनुसार, अजय पावरा यास जून २०२२ मध्ये दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. असे असतानाही पोलिसांची कुठलीही पूर्वपरवानगी किंवा न्यायालयाची परवानगी न घेता पावरा हा जिल्ह्यात दाखल झाला. ही बाब पोलिसांना माहिती झाल्यावर त्यास ब्राम्हणपुरी गावात बसस्थानक परिसरातून अटक केली. याबाबत पोलिस कर्मचारी अजितसिंग नागलोत यांनी फिर्याद दिल्याने अजय ऊर्फ टायगर पावरा याच्याविरुद्ध शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार रमण वळवी करीत आहेत.