शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यू येतोय नियंत्रणात साथीचे आजार मात्र कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 12:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : साथीचे आजार लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहावे. पालिकेतर्फे उपाययोजना करण्यात येत असून सहकार्य करण्याचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : साथीचे आजार लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहावे. पालिकेतर्फे उपाययोजना करण्यात येत असून सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. दरम्यान, डेंग्यूवर ब:यापैकी नियंत्रण मिळविण्यात आले असले तरी वारंवारच्या वातावरणातील बदलामुळे विविध आजारांची साथ सुरूच असल्याची स्थिती आहे. शहरात गेल्या दोन महिन्यांपासून डेंग्यूने हैराण करून सोडले होते. आरोग्य विभाग आणि पालिकेने विविध उपाययोजना केल्या असल्यातरी डेंग्यूची साथ पूर्णपणे संपली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांनीही उपाययोजना कराव्या व साथीच्या आजारांपासून दूर राहावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. डासांमुळे मलेरिया, डेंग्यु, चिकनगुनिया, हत्तीरोग आणि मेंदुज्वरसारखे आजार होतात. ते थांबविण्यासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी व आठवडय़ातुन एक दिवस कोरडा पाळावा, असे आवाहन नगरपरिषदेने केले आहे.  सर्वत्र पावसाचे वातावरण असल्यामुळे ब:याच ठिकाणी केर-कचरा साचतो. तसेच गटारीत कचरा साचल्यामुळे त्या बंद पडतात. या साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होते व त्यापासून डेंग्यु, मलेरिया तसेच अन्य साथिचे आजार   पसरत असतात. त्याचप्रमाणे   घराच्या छतावर किंवा अडगळीत पडलेल्या वस्तुंमध्ये पाणी साचते. घरातील माठ, डब्बे, टायर, कुलर आणि फुलदाण्यांमध्ये पाणी साचलेले राहते. अशा ठिकाणाहून डासांचे प्रजनन होऊन डेंग्यू, मलेरिया तसेच विविध प्रकारच्या साथिच्या रोगाची लागण होते व आजार पसरतात. या आजारांपासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाने एक कोरडा दिवस पाळावा. असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे. ासांची उत्पत्ती थांबविण्यासाठी घरातील पाण्याची भांडी कोरडी करून स्वच्छ ठेवावेत.