मांजरे व होळतर्फे रनाळे येथे बीज प्रकिया प्रात्यक्षिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:22 IST2021-05-31T04:22:28+5:302021-05-31T04:22:28+5:30

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, उपविभागीय कृषी अधिकारी नीलेश भागेश्वर, तालुका कृषी अधिकारी आर.डी. वळवी, मंडळ कृषी अधिकारी ...

Demonstration of Seed Processing at Ranale by Cats and Holes | मांजरे व होळतर्फे रनाळे येथे बीज प्रकिया प्रात्यक्षिक

मांजरे व होळतर्फे रनाळे येथे बीज प्रकिया प्रात्यक्षिक

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, उपविभागीय कृषी अधिकारी नीलेश भागेश्वर, तालुका कृषी अधिकारी आर.डी. वळवी, मंडळ कृषी अधिकारी विजय मोहिते व कृषी पर्यवेक्षक करणसिंग गिरासे यांच्या मार्गदर्शनाखाली मांजरे व होळ येथे कृषी सहायक उत्सव पाटील व पंकज धनगर यांनी मूग या बियाण्यावर बीज प्रकियेचे व सोयाबीन उगवण क्षमता तपासणी प्रात्यक्षिक करून दाखविले. खरीप हंगामात पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी बियाणे बीज प्रकिया करूनच पेरणी करण्याबाबत जनजागृती करण्यात आली. कृषी पर्यवेक्षक करणसिंग गिरासे यांनी शेतकऱ्यांना मूग, उडीद, सोयाबीन बीज प्रक्रियेचे महत्त्व, रासायनिक खतांची बचत मोहीम अंतर्गत पीकनिहाय खत व्यवस्थापन व १० टक्के रासायनिक खताची मात्रा भरून काढण्यासाठी पर्याय म्हणून सेंद्रिय खताचा वापर तसेच ताग, धैचा यासारख्या हिरवळीचे खताचा वापर करण्याचे सुचविले. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना व पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड योजनेविषयी शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. मंडळ कृषी अधिकारी विजय मोहिते यांनी मांजरे व होळ गावातील जमीन सुपिकता निर्देशांकानुसार द्यावयाची खतमात्रा याविषयी मार्गदर्शन केले. कापूस पिकाबाबत ‘एक गाव एक वाण’ या योजनेची माहीती देऊन योजनेचे महत्त्व पटवून देण्यात आले. रासायनिक खतांचा पुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने बांधावर खत योजनेची माहिती देण्यात आली. तसेच महाडीबीटी योजनेबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व परिसरातील शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी कृषिमित्र व ग्रामरोजगार सेवक यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Demonstration of Seed Processing at Ranale by Cats and Holes