शहरं
Join us  
Trending Stories
1
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
2
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
3
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर ST खोल खड्ड्यात कोसळली, २५ प्रवासी थोडक्यात बचावले
4
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
5
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
6
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
7
शनि अमावस्येच्या रात्री दोघांची हत्या; धुळ्यात भोंदू बाबाचं कृत्य, सगळं केलं पण एका चुकीने अडकला
8
क्रिकेटरशी जोडलं नाव, आता करोडपती यूट्युबरची बायको होणार 'ही' अभिनेत्री? लग्नाची रंगली चर्चा
9
मोठी कारवाई! TMCच्या कार्यालयावर छापे; सरकारी जमिनीची कागदपत्रे, १००हून अधिक आधार कार्ड जप्त
10
लोकसंख्या वाढीसाठी चंद्राबाबू नायडूं यांची मोठी घोषणा! तिसऱ्या आणि चौथ्या अपत्यासाठी सुरू केली 'कॅश ऑफर' योजना! कारण काय?
11
लातूर ते पुण्याची 'ती' बिल्डिंग... नीट पेपर फोडण्यासाठी विषयांची वाटणी, प्राध्यापिका CBIच्या ताब्यात
12
Virat Kohli : किंग कोहलीचा विक्रमी धडाका! IPL इतिहासात कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं
13
Mouni Roy : संसार मोडल्यावर मौनी रॉय आणि दिशा पाटनी रिलेशनशिपमध्ये? जाणून घ्या, व्हायरल पोस्टचं 'सत्य'
14
आयडियाची कल्पना! सूट-बूट घालून विकतोय फ्राईड राईस; दरमहा ७ लाखांची कमाई
15
पंतप्रधान मोदी यांचा ८ वर्षांनी स्वीडन दौरा; व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण मुद्द्यांवर चर्चा
16
Summer Tips: उन्हाळ्यात लोक टक्कल का करतात? जाणून घ्या त्यामागील आरोग्यदायी फायदे!
17
मुलीचं मौन म्हणजे 'कबूल है-कबूल है-कबूल है...!' अफगाणिस्तानात तालिबानची बालविवाहाला मंजूरी
18
Rahul Gandhi: "शिक्षणमंत्र्यांवर अजूनही कारवाई का नाही?" NEET पेपरफुटी प्रकरणावर राहुल गांधींचा संताप
19
युद्धातून वाट काढत २०००० टन LPG सह जहाज भारतात! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये IRAN-US ला अशी दिली हुलकावणी
20
निरोपाचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार? समोर येतेय अशी अपडेट
Daily Top 2Weekly Top 5

जादा व्याजाचे आमिष दाखवून ठेवीदारांना गंडविले

By admin | Updated: April 17, 2017 23:19 IST

मध्य प्रदेशातील कंपनीचा प्रताप : शहादा व धडगाव तालुक्यातील ठेवीदारांची तक्रार

शहादा : ठेवीवरील रक्कमेवर जादा व्याज देण्याचे आमिष दाखवून मध्य प्रदेशातील एका कंपनीने शहादा व धडगाव तालुक्यातील गोरगरीब जनतेस सुमारे तीन कोटी रुपयांचा चुना लावल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कंपनीचे एजंट म्हणून काम करणा:या धडगाव तालुक्यातील 10 एजंटांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुखांकडे धाव घेतली आहे.
मध्य प्रदेशातील जी लाईफ ग्रुप ऑफ कंपनीने शहादा व धडगाव तालुक्यात एजंट नेमून ठेवी गोळा केल्या आहेत. ठेवीवर अधिक व्याजाचे प्रलोभन दाखवून व खोटी आश्वासने देऊन सुमारे पाच ते सहा वर्षापासून ठेवी गोळा करण्याचे काम सुरू होते. दरमहा 300 रुपयांपासून ते दोन हजार, पाच हजार रुपयांची गुंतवणूक करून 60 महिन्यात दीडपट पैसे देण्याचे आमिष कंपनीकडून दाखविण्यात आले होते. या आमिषाला बळी पडून अनेकांनी या योजनेत पैसे गुंतवले होते. ज्यांची मुदत पूर्ण झाली त्यांना कंपनीने धनादेशही दिले होते. मात्र कंपनीने दिलेले सहा ते सात लाखांचे परतफेडीचे धनादेशही परत आल्याने गुंतवणूकदारांना आपण फसविले गेल्याचे लक्षात आले. कंपनीच्या शिरपूर येथील कार्यालयात ठेवीदार आणि एजंट यांनी पैसे परत मिळण्याची मागणी केली असता तेथेही त्यांच्या पदरी निराशा पडली.
धडगाव तालुक्यातील ठेवीदारांनी एजंटांकडे पैशांचा तगादा लावल्याने आणि कंपनीकडून पैसे मिळण्याची अपेक्षा मावळल्याने सरदार नवेल (धडगाव), दिगंबर पवार (अंबापूर, ता.शहादा), सुरेश पावरा (इस्लामपूर, ता.शहादा), गोविंद चितोड (इस्लामपूर, ता.शहादा), गोपाळ शिंदे (धडगाव), संजय शिंदे (वेरी, ता.अक्कलकुवा), उदयसिंग पवार, (अंबापूर, ता.शहादा), राजेंद्र पावरा (धडगाव), अशोक निकुंब (गणोर, ता.शहादा) व गणेश परमार (धडगाव) या 10 एजंटांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीसप्रमुखांकडे धाव घेऊन जी लाईफ ग्रुप ऑफ कंपनीज, संस्थापक चेअरमन गिरीराज पांडे, व्यवस्थापकीय संचालक दीपक शर्मा, यक्षप्रसाद शर्मा, अनामत अली, रवीराज व व्यवस्थापक जी लाईफ कंपनी शिरपूर कार्यालय यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
जी लाईफ कंपनीच्या संचालकांनी अधिक व्याजाचे प्रलोभन दाखवून व खोटे आश्वासन देऊन गोरगरीब लोकांची फसवणूक  केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. कंपनीच्या संस्थापकांतर्फे नंदुरबार येथे दीपक शर्मा व गिरीराज पांडे यांनी सेमीनार घेऊन विविध प्रलोभने दाखवून ठेवी गोळा केल्या. कंपनीने ठेवीधारकांना प्रमाणपत्रही दिले आहेत. परंतु मुदत पूर्ण होऊनही कंपनीकडून पैसे परत न मिळाल्याने त्यांची फसवणूक झाली आहे. ठेवीदार पैशांसाठी एजंटांकडे तगादा लावत असल्याने एजंटांचे जगणे मुश्कील झाले आहे. गोरगरीब आदिवासी जनतेची फसवणूक करणा:या जी लाईफ कंपनी व त्यांच्या संचालकांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी आहे.
    (तालुका प्रतिनिधी)