शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
3
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
4
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
5
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
6
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
7
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
8
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
9
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
10
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
11
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
12
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
13
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
14
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
15
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
16
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
17
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
18
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
19
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य कर्मचा-यांचे वेतन वेळेवर करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:33 IST

शासन ज्यांना कामावर बोलवत नाही त्यांचे वेतन नियमित होत आहेत. परंतू दुसरीकडे सातत्याने कार्यरत असलेल्या आरोग्य कर्मचारींना मात्र ...

शासन ज्यांना कामावर बोलवत नाही त्यांचे वेतन नियमित होत आहेत. परंतू दुसरीकडे सातत्याने कार्यरत असलेल्या आरोग्य कर्मचारींना मात्र वेळेवर मिळत नसल्याचे दिसून आले आहे. याबाबत प्रशासनाला वारंवार ही बाब निदर्शनास आणून देखील त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. दरमहा पंधरा तारखेच्या पुढेच वेतन होत आहेत. मार्च महिन्याचे वेतन तर २७ एप्रिल रोजी मिळाले. एप्रिल महिन्याच्या वेतनासाठी २० मे तारीख उजाडण्याची शक्यता आहे.

वेतन विलंब होवू नये यासाठी शासनाने दरमहा एक तारखेला वेतन अदा व्हावे यासाठी नियम करुन दिला आहे. तसेच सेवार्थ प्रणालीच्या माध्यमातून विहीत मुदत ठरवून दिली आहे. मात्र कधीही या नियमांचे पालन होत नसल्याने आरोग्य कर्मचा-यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. वेतन विलंब होऊ नये यासाठी कायमस्वरुपी तोडगा काढून वेतन दरमहा एक ते पाच तारखेच्या आत व्हावे यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना कराव्यात अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा जि.प.आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.