शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
3
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
7
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
8
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
9
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
10
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
11
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
12
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
13
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
14
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
16
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
17
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
18
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
19
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
20
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
Daily Top 2Weekly Top 5

लोंढरे येथे मोबाइल टॉवर उभारण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:24 IST

शहादा तालुक्यातील लोंढरे हे गाव सपाटीवर असले तरी गावात आजवर मोबाइलचे नेटवर्क उपलब्ध नसल्याचा दावा नागरिकांकडून होत आहे. ...

शहादा तालुक्यातील लोंढरे हे गाव सपाटीवर असले तरी गावात आजवर मोबाइलचे नेटवर्क उपलब्ध नसल्याचा दावा नागरिकांकडून होत आहे. येथून पाच किलोमीटर अंतरावरील निंभोरे व चार किलोमीटर अंतरावरील कहाटूळ येथे मोबाइल नेटवर्क येते. परंतु लोंढरे मात्र यापासून वंचित आहे.

कोरोना महामारीमुळे या शैक्षणिक वर्षात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण चालूच आहे. रेंज नसल्यामुळे विद्यार्थ्यांनाही ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.

केंद्र सरकारने डिजिटल इंडियाच्या धर्तीवर अनेक सेवा ऑनलाइन केल्या आहेत. त्यामध्ये वीजबिल भरणे, पैसे ट्रान्सफर करणे यासारखे अनेक गोष्टी घरबसल्या होत असतात. पण रेंजअभावी ग्राहकांना पैसे ट्रान्सफर करायलाही बँकेतच जावे लागत असल्याचे निदर्शनास येत आहे. फोरजी पॅकेज होऊनही टॉवरमुळे नेटवर्क मिळत नसल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. लोंढरे खासगी कंपनीचे टॉवर उभारायला हवे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

गावाची लोकसंख्या साधारणत: अडीच हजारांपर्यंत आहे. येथे खासगी कंपनीचे ७०० ते ८०० ग्राहक. गावाला कहाटूळ किंवा निंभोरे येथून रेंज भेटत असते, पण त्याची तीव्रता अत्यंत कमी असून, रेंजसाठी आमचे मोबाइल ओट्यावरच टांगावे लागतात. यामुळे येथे टावर सुरू करावा

शांतीलाल रोकडे, पोलीसपाटील, लोंढरे