शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

वाल्हेरी आरोग्य केंद्रासाठी नव्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:59 IST

या वेळी ॲड. सीमा वळवी यांनी मानव विकास कार्यक्रमामध्ये उपस्थित गरोदर, स्तनदा माता व लहान बालकांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन केले. ...

या वेळी ॲड. सीमा वळवी यांनी मानव विकास कार्यक्रमामध्ये उपस्थित गरोदर, स्तनदा माता व लहान बालकांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन केले. गरोदर व स्तनदा मातांना अंगणवाडीमार्फत पुरविल्या जाणाऱ्या अमृत आहाराची विचारपूस करुन गरोदरपणातील आहार व काळजीबाबत बोलीभाषेत समजावून सांगितले. या वेळी बालरोगतज्ज्ञ डॉ. रणजित पावरा व डॉ. इंद्रसिंग वळवी उपस्थित होते. रुग्ण कल्याण समितीच्या बैठकीत विविध आरोग्यविषयक मुद्यांवर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. नवीन रुग्णवाहिका लोकार्पण कार्यक्रमास पं.स. सदस्या सुमनबाई वळवी, धर्मेंद्र वळवी, वाल्हेरीचे सरपंच पुन्या वसावे, उपसरपंच विलास वसावे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. प्राथमिक आरोग्य केंद्रातील सोयी-सुविधांबाबत व रुग्णसेवेबाबत जि.प. अध्यक्षा ॲड. सीमा वळवी यांनी समाधान व्यक्त केले.

याच कार्यक्रमात कोरोना काळात कार्यक्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी व आशा कर्मचारी यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला व येत्या काळात अजून जास्त उमेदीने काम करण्याचे प्रोत्साहन दिले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण यांनी शासनाच्या विविध आरोग्य योजनांबाबत माहिती दिली. कार्यक्रमासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ.सायसिंग पावरा, पवार, ठाकरे, आरोग्य सहायक राणे, आरोग्यसेवक जगदीश नाईक, धनगर व आरोग्य सेविकांनी सहकार्य केले.