शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

‘समर्पण’ने केली सातपुडय़ातील गरीबांची दिवाळी गोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 13:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : समर्पण या सेवाभावी व्हाट्सअप ग्रुपच्या वतीने दिवाळी फराळ व जीवनावश्यक वस्तू वाटपाचा शुभारंभ जि.प.चे ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : समर्पण या सेवाभावी व्हाट्सअप ग्रुपच्या वतीने दिवाळी फराळ व जीवनावश्यक वस्तू वाटपाचा शुभारंभ जि.प.चे माजी सदस्य अभिजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. गेल्या सात वर्षापासून ग्रुपतर्फे हा उपक्रम सुरू आहे.या वेळी विष्णू जोंधळे, अनिल भामरे, राजेंद्र गुप्ता, रूपेश जाधव, प्रा.नेत्रदीपक कुवर, सुपडू खेडकर, अजित बाफना, विनोद जैन, प्रा.डॉ.अनिल साळुंके आदी उपस्थित होते. युवकांच्या माध्यमातून सुरू झालेला हा उपक्रम परिसर व राज्यात आदर्श असून याला व्यापक करण्याच्या संकल्पाला अभिजित पाटील यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. समाज माध्यमांच्या आभासी दुनियेत आता माणुसकी स्त्रवते आहे.  या आधुनिक युगातही सातपुडय़ाच्या गिरीकंदरातील आदिवासी बांधवांची दिवाळी साजरी करण्यासाठी धडपडणा:या आणि समर्पित अशा सर्वसामान्य कुटुंबातील युवकांचे ‘समर्पणा’ने सात वर्षे पूर्ण केली आहेत. गेल्या सहा वर्षापूर्वी  स्व.महेश पाटील यांच्या संकल्पनेतून सौरभ जहागिरदार व प्रशांत पाटील   या शिक्षीत व सर्वसामान्य  कुटुंबातील तरुणांनी हा विडा उचलला. यातूनच आपले मित्र  व समविचारी लोकांच्या माध्यमातून एक एक करत 226 जण एकत्रित आलेत आणि त्यातूनच समर्पण अनेकांची दिवाळी साजरी करतोय. समर्पणच्या माध्यमातून सातपुडय़ाच्या दुर्गम भागात दिवाळीनंतरची दिवाळी सुरू होते.  कोणाच्याही व्यक्तीगत नावाशिवाय चाललेला हा उपक्रम आज राज्यात लौकिकास पात्र झाला आहे. या वेळी समर्पणला आकार देणा:या स्व.महेश पाटील यांना उपस्थितांनी श्रद्धांजली अर्पण    केली.समर्पण ग्रुपतर्फे यंदा 150 किलो चिवडा, 30 किलो सोनपापडी, 800बिस्कीटपुडे, एक हजार 200 कॅडबरी चौकलेट, 350 चप्पल जोड, 175 ब्लँकेटस, 350 मुलांचे ड्रेस, 45 शाली, 255 मोठय़ा मुलांचे ड्रेस, 255 लहान मुलींचे ड्रेस, 35 लहान मुलांचे स्वेटर, 45 कानटोप्या, 65  मोठय़ा माणसांचे ड्रेस, 65 साडय़ा, 250 फरसाण पाकीट आदींचे वाटप तोरणमाळ व जवळच्या पाडय़ांमध्ये करण्यात आले.