शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
7
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
8
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
9
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
10
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
11
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
12
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
13
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
14
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
15
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
16
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
17
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
18
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
19
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
20
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Daily Top 2Weekly Top 5

सुसरी धरणाच्या पाणी पातळीत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 12:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील शहादा-खेतिया रस्त्यावरील सुसरी धरणाच्या पाण्याची पातळी खालावत असल्याने मृतसाठा शिल्लक आहे. वाढत्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील शहादा-खेतिया रस्त्यावरील सुसरी धरणाच्या पाण्याची पातळी खालावत असल्याने मृतसाठा शिल्लक आहे.वाढत्या उष्णतेबरोबर जमिनीतील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे. खालावणाऱ्या पाण्याच्या पातळीने विहिरी आटू लागल्या आहेत. तर कुपनलिकांचेही पाणी काही प्रमाणात पाणी कमी झाले आहे. त्यामुळे तालुक्यात अनेक गावात पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये यासाठी उपाययोजना करणे अपेक्षित आहे. गेल्यावर्षी आॅगस्टच्या परतीच्या पावसाला चांगलाच जोर आल्यामुळे १५ दिवस या पावसाने चांगलाच धूमाकूळ घातला होता. या दमदार पावसामुळे सुसरी धरणाच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली होती. परंतु एप्रिल महिन्यापासून दिवसेंदिवस वाढत्या उष्णतेमुळे सुसरी धरणाची पाणी पातळी खालावत आहे. यामुळे शेतकऱ्यांबरोबरच मासेमारी करणारेही संकटात सापडण्याची वेळ निर्माण झाली आहे.गाळ काढण्यास अल्प प्रतिसादधरणातील गाळ शेतात टाकल्यामुळे रासायनिक खतामुळे जमिनीची झालेली हानी भरून निघते व जमीन सुपीक होते. त्यामुळे परिसरातील शेतकरी गेल्या अनेक वर्षापासून गाळचा उपसा करतात. हा गाळ जेसीबी मशीनद्वारे काढण्यात येत असून त्याची ट्रॅक्टर व डपंरच्या सहाय्याने वाहतूक केली जात असते. परंतु यंदा कोरोना महामारीमुळे शेतकºयांचे आर्थिक गणित बिघडले असून शेतमालाला भाव नसल्याने माल शेतातच खराब होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे हातात पैसा नसल्याने शेतात गाळ टाकण्यास अल्प प्रतिसाद दिसून येत आहे.