शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेच्या धड्याने क्षयरोग रुग्णांमध्ये घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:28 IST

दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांकडून या आजाराबाबत सांगितले जाते की, पूर्वी हा आजार ओळखणे अवघड होते. एखाद्या झाडाला कीड लागते तशा ...

दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांकडून या आजाराबाबत सांगितले जाते की, पूर्वी हा आजार ओळखणे अवघड होते. एखाद्या झाडाला कीड लागते तशा प्रकारे रुग्ण खंगून मृत्यूमुखी पडत होता. परंतु नंतर शासनाकडून क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमास सुरुवात झाली. तसेच औषधोपचार वेळेवर होऊ लागल्याने क्षयरोगाचे प्रमाण कमी हाेण्यास मदत होऊ लागली.

आशा स्वयंसेविकांच्या मदतीने रुग्ण बरे

दोन आठवडे किंवा जास्त दिवस असणारा खोकला, हलकासा परंतु संध्याकाळी वाढणारा ताप, वजन कमी होणे, भूक मंदावणे, रात्री खूप घाम येणे, छातीत दुखणे, बेडक्यातून रक्त येणे यासारखी लक्षणे असलेल्या रुग्णांना आशा स्वयंसेविकांकडून तपासणी करण्यास प्रवृत्त करण्यात येत असल्याने त्यांना वेळीच औषधोपचार मिळून क्षयरोग बरा होण्यास मदत होऊ लागली आहे. त्याबरोबरच आरोग्य विभागाकडून क्षयरोगाविषयी मुबलक प्रमाणात जनजागृतीही करण्यात आल्याने तसेच नागरिकांमध्ये क्षयरोग झाला तरी पूर्णपणे औषधोपचार घेतल्याने बरा होतो, याबाबत जनजागृती झाल्यास क्षयरोगाला रोखता येऊ शकते, असा ठाम विश्वास निर्माण झाल्यास क्षयराेग निर्मूलनास मदत होत आहे.

क्षयरोग हा प्रामुख्याने फुफ्फुसाच्या ८० टक्के व इतर अवयवांचा २० टक्के म्हणजे आतडे, हाडे, मणके, गर्भाशय, मूत्रपिंड आदी अवयवांना होऊ शकतो. फक्त आपली नखे व केस यांना क्षयरोग होत नाही.