रुग्णांची संख्या वाढल्याने रुग्ण बरे होण्याच्या टक्केवारीत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:32 IST2021-03-23T04:32:31+5:302021-03-23T04:32:31+5:30

नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या रुग्ण बरे होण्याच्या टक्केवारीत घट आली आहे. जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट हा २३.८ टक्के ...

Decrease in patient recovery rate due to increase in number of patients | रुग्णांची संख्या वाढल्याने रुग्ण बरे होण्याच्या टक्केवारीत घट

रुग्णांची संख्या वाढल्याने रुग्ण बरे होण्याच्या टक्केवारीत घट

नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या रुग्ण बरे होण्याच्या टक्केवारीत घट आली आहे. जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट हा २३.८ टक्के तर कोरोनामुक्तीचा रेट ७४.३ टक्के एवढा आहे. जिल्ह्यात आज अखेरीस १३ हजार २३५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

२०२० मध्ये नियंत्रणात असलेल्या कोरोनाने मार्च २०२१ मध्ये वेगाने वाढवल्याने जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही १० हजारांच्या पार गेली होती. यामुळे तूर्तास जिल्ह्यात रुग्णसंख्या ही १३ हजारांच्या घरात पोहोचली आहे. यात नंदुरबार तालुक्यात सर्वाधिक ५ हजार ७५२, शहादा ४ हजार ८२०, तळोदा १ हजार १२१, अक्कलकुवा २९७ तर धडगाव तालुक्यातील १२३ अशा १३ हजार २३५ जणांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे जिल्ह्यात आज अखेरीस एकूण २४८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यातून जिल्ह्याचा मृत्यू दर हा १.९ टक्के आहे. जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यात सर्वाधिक ९४, शहादा ९०, तळोदा ३५, नवापूर २१, अक्कलकुवा ४ तर धडगाव तालुक्यातील ४ अशा एकूण २४८ जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. मृतांची संख्या ही वाढत असल्याने चिंताही वाढल्या आहेत. दरम्यान जिल्ह्यात कोरोनामुक्तीचा दर हा आज अखेरीस ७४.३ टक्के एवढा आहे. जिल्ह्यातून आजवर ९ हजार ८३३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मार्च महिन्याच्या प्रारंभीपासून वाढत्या कोरोना रुग्णांमुळे जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध घातले असून शहरी भागात सायंकाळी सात ते सकाळी सहा यादरम्यान संचारबंदी घोषित केली आहे. गर्दी होईल असे कार्यक्रम घेण्यासही बंदी घालण्यात आली असून विवाह सोहळे, अंत्ययात्रा, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये केवळ ५० जणांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. या कार्यक्रमांवर महसूल व पोलीस पथकांकडून लक्ष ठेवण्यात येत आहे.

Web Title: Decrease in patient recovery rate due to increase in number of patients