शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
3
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
6
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
7
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
8
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
9
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
10
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
11
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
12
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
13
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
14
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
15
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
18
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
19
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
20
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

लोकप्रतिनिधींकडून नुकसानीची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 12:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहादा तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जोरदार वादळासह पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहादा तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जोरदार वादळासह पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सुमारे पाऊण तास चाललेल्या या पावसाने शेतपिकांचे व घरांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी विजेचेखांब उन्मळून पडल्याने वीज तारा तुटल्या व वीजपुरवठा खंडित झाला आहे. सोनवलतर्फे बोरद व डोंगरगाव आदी भागात शेतीसह घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शनिवारी नुकसानग्रस्त भागाला पालकमंत्री अ‍ॅड.के.सी. पाडवी, खासदार डॉ.हीना गावीत, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध संस्थांचे पदाधिकारी, प्रांताधिकारी डॉ.चेतनसिंग गिरासे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, गटविकास अधिकारी सी.टी. गोस्वामी, तालुका कृषी अधिकारी किशोर हडपे, तलाठी, मंडळ अधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी लोकप्रतिनिधींनी पाहणी करून संबंधित विभागांना नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.४तळोदा तालुक्यात नुकसान झालेल्या घरांची व शेतपिकांची पाहणी शनिवारी पालकमंत्री अ‍ॅड.के.सी. पाडवी, आमदार राजेश पाडवी, प्रांताधिकारी अविशांत पांडा, तहसीलदार पंकज लोखंडे, गटविकास अधिकारी सावित्री खर्डे, निवासी नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे, तालुका कृषी अधिकारी नरेंद्र महाले, विस्तार अधिकारी संजय पाटील, मंडळ अधिकारी एम.ए. साळवे, कृषी सहायक चंद्रप्रकाश पवार, बोरसे, देशमुख, मोडचे सरपंच जयसिंग माळी, मंडळ अधिकारी माया मराठे, ग्रामविकास अधिकारी शांतीलाल बावा, तलाठी अरुण धनगर आदींनी नुकसानीची पाहणी केली. घरांसह शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने पंचनामे करावेत, अशी सूचना लोकप्रतिनिधींना अधिकाऱ्यांना दिली.वादळामुळे सोनवलतर्फे बोरद, परिवर्धा या परिसरात शेतीचे व अनेक घरांचे मोठे नुकसान झाले आहे. सुमारे ३५० विजेचे खांब कोसळल्याची माहिती आहे. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून अजून पंचनामा पूर्ण झाला नसल्याने नेमका अंदाज वर्तवता येणार नाही. येत्या दोन दिवसात महसूल व कृषी विभागाकडून आलेल्या नुकसानीच्या पंचनामा अहवालानंतरच अधिकृत नुकसानीचा अंदाज येईल. नुकसान झालेल्या शेतकरी व पडझड झालेल्या घरांच्या नुकसानग्रस्तांच्या पाठीशी शासन पूर्णपणे उभे आहे. नुकसानग्रस्त शेतकरी व घर मालकांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देणार असल्याची माहिती पालकमंत्री अ‍ॅड.के.सी. पाडवी यांनी दिली.पाहणीदरम्यान संबंधित विभागाच्या अधिकाºयांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना खासदार व आमदारांनी दिल्या. नुकसानग्रस्तांचे पंचनामे करून यादी ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डावर लावण्याची सूचना करुन नुकसानग्रस्तांना तातडीने मदत दिली जाईल, असे आश्वासन दिले. तसेच घरे कोसळून जखमी झालेल्यांना तात्काळ दवाखान्यात दाखल करण्याच्या सूचना दिल्या. वादळामुळे विजेचे खांब वाकून तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. खंडित वीजपुरवठा दोन दिवसात सुरू करण्याची हमी वीज कंपनीच्या अधिकाºयांनी दिली. वादळामुळे घरांची पडझड होऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करुन प्रांताधिकारी व तहसीलदार यांना दोन दिवसात घराचे व कृषी विभागाने शेतीचे पंचनामे करून शेतकºयांच्या नुकसानीबाबत अहवाल तातडीने द्यावा. पंचनामे करीत असताना एकही शेतकरी अथवा नुकसानग्रस्त व्यक्तीचे नाव सुटणार नाही याची दक्षता संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांनी घेण्याची सूचना खासदार डॉ.हीना गावीत आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी दिली.