शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
4
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
5
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
6
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
7
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
8
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
9
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
10
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
11
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
12
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
13
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
14
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
15
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
16
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
17
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
18
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
19
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
Daily Top 2Weekly Top 5

धार्मिक स्थळे उघडल्याने दर्शनासाठी भाविकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 11:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अनलॉकडाऊनमध्ये जिल्ह्यातील धार्मिक स्थळे अटी व शर्र्तींच्या अधीन राहून सुरू करण्यास परवाणगी देण्यात आल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अनलॉकडाऊनमध्ये जिल्ह्यातील धार्मिक स्थळे अटी व शर्र्तींच्या अधीन राहून सुरू करण्यास परवाणगी देण्यात आल्याने जिल्ह्यातील प्रकाशा, सारंगखेडा येथील धार्मिक स्थळांसह नंदुरबारातील मंदीरे देखील सुरू झाली.अनलॉकडाऊन मध्ये सोमवारपासून धार्मिक स्थळे उघडण्यास देखील परवाणगी देण्यात आली आहे. त्यानुसार सकाळी प्रार्थना व पूजास्थळे उघडली. एकावेळी एकालाच मंदीराच्या गर्भगृहात प्रवेश दिला जात होता. मंदीरात पाच पेक्षा अधीक जणांना प्रवेश नाकारण्यात येत होता. आज संकष्ट चतुर्थी असल्यामुळे नंदुरबारातील गणपती मंदीर आणि वळण रस्त्यावरील दंडपाणेश्वर गणपती मंदीरावर सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. दर्शनासाठी येथे भाविकांना प्रतिक्षा करावी लागत होती.धार्मिक स्थळे सुरू करण्यात आली असली तरी सामुहिक रित्या आरती, भजन, संकीर्तन किंवा त्या त्या धर्माप्रमाणे सामुहिक रित्या कुठलाही कार्यक्रम घेण्यास मनाई करण्यात आली आहे. मंदीरात येतांना मास्क लावणे बंधनकारक तसेच दोन जणांमध्ये अंतर ठेवूनच उभे राहणे आवश्यक आहे.मूर्तीला हात लावता येणार नाही, घंटा वाजवता येणार नाही. मंदीरात जास्त वेळ थांबता येणार नाही अशा काही अटी घालण्यात आल्या आहेत.नंदुरबारातील गणपत मंदीरात सकाळी एकच दरवाजा उघडण्यात आला होता. त्याद्वारे प्रत्येकी एकाला दर्शनासाठी आत सोडण्यात येत होते.