शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

उद्या १०५ ठिकाणी पीक कर्ज मेळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 12:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शेतकऱ्यांना पीक कर्जाचे अर्ज भरण्यास सुलभ व्हावे यासाठी जिल्ह्यात २२ जून रोजी १०५ बँक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शेतकऱ्यांना पीक कर्जाचे अर्ज भरण्यास सुलभ व्हावे यासाठी जिल्ह्यात २२ जून रोजी १०५ बँक शाखांतर्फे विविध गावात पीक कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी केले आहे.पालकमंत्र्यांनी नंदुरबार येथे घेतलेल्या आढावा बैठकीत बँक अधिकाº्यांशी पीक कर्ज वाटपाचे प्रमाण वाढविण्याविषयी चर्चा केली होती. शेतकºयांना पीक कर्ज योजनेची व अर्ज भरण्याची माहिती नसल्याने ते कर्ज घेण्यापासून वंचित रहातात. त्यामुळे मेळाव्याच्या माध्यमातून त्यांच्याकडून अर्ज भरून घ्यावे व पीक कर्ज मिळविण्यासाठी अत्यंत सोपी प्रक्रीया असल्याचा संदेश त्यांच्यापर्यंत देण्यात यावा, असे निर्देश अ‍ॅड.पाडवी यांनी प्रशासनाला दिले होते. त्यानुसार या मेळाव्यांचे आयोजन होत आहे.पालकमंत्र्यांनी म्हटले आहे की, खरीपाचा हंगाम सुरू झाला आहे. शेतकरी राजा संकटाची भिती बाजूला सारून नव्या हंगामासाठी तयारीला लागला आहे. संकटावर मात करण्याची शेतकºयांची जणू परंपराच आहे. पण अशा परिस्थितीत खते, बी-बियाणे, अवजारे यासाठी त्याला आर्थिक सहकार्याची आवश्यकता असते. म्हणून शासनातर्फे कर्ज देण्याची सुविधा उपलब्ध आहे. आपल्या जिल्ह्यातील अनेक शेतकºयांनी अजूनही कर्ज योजनेचा लाभ घेतलेला नाही. बºयाचदा माहिती नसल्याने असा लाभ घेणे शक्य होत नाही. अशी माहिती देण्यासाठी हे मेळावे होणार आहेत.गेल्यावर्षी जिल्ह्याने पीक कर्ज वाटपाचे साधारण ४० टक्के उद्दीष्ट गाठले होते. यावर्षी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त शेतकºयांना पीक कर्ज देऊन ८० टक्क्यापेक्षा जास्त उद्दीष्ट गाठण्याचा प्रयत्न आहे. शेतकºयांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा आणि कजार्बाबत काही समस्या असल्यास तलाठी किंवा ग्रामसेवकामार्फत प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन अ‍ॅड.पाडवी यांनी केले आहे. सर्व बँक शाखांच्या अधिकारी-कर्मचाºयांनी संवेदनशिलतेने शेतकºयांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी मदत करावी आणि हा खरीप हंगाम त्यांच्यासाठी आनंददायी ठरेल असे प्रयत्न करावे, असे आवाहनही पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी केले आहे.