शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

गर्दीचे उल्लंघन केल्याने गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 11:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नगरसेवक पूत्राच्या लग्नाच्या स्वागत समारंभातील गर्दी असल्याचे पुरावे मिळाल्याने चौकशी समितीचे सदस्य तथा तहसीलदार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नगरसेवक पूत्राच्या लग्नाच्या स्वागत समारंभातील गर्दी असल्याचे पुरावे मिळाल्याने चौकशी समितीचे सदस्य तथा तहसीलदार यांनी आयोजक नगरसेवकावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सार्वजनिक ठिकाणी मर्यादेपेक्षा अधीक जणांनी गर्दी केल्याचा हा जिल्ह्यातील पहिला गुन्हा ठरला आहे. त्यामुळे लग्न समारंभ, अंत्ययात्रा तसेच स्वागत समारंभांमधील गर्दीवर आळा बसेल अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त होत आहे.गेल्या दोन दिवसांपासून राजकीय रंग चढलेल्या या प्रकरणाची चर्चा जिल्हाभर सुरू होती. भाजप, मनसे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती. प्रातांधिकारी वसुमना पंत यांनी तहसीलदार व शहर पोलीस ठाण्याचे निरिक्षक यांची चौकशी समिती नेमली होती. चौकशी समितीच्या हाती आलेल्या माहितीवरुन व पुराव्यावरून मर्यादेपेक्षा अधीक गर्दी झाल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल्ह्यातील संचारबंदी आदेश आणि साथ रोग प्रतिबंधक कायदा व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्याबद्दल तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.परवेज खान यांनी ३० जून पर्यंत मनाई आदेश लागू असताना सदर आदेशाचा भंग करून मौजे झराळी येथील फार्म हाऊसवर मुलाच्या लग्न समारंभानिमित्त ७ जून रोजी स्नेह भोजनाचे आयोजन केले होते. कार्यक्रमास ५० व्यक्तिंची परवानगी असताना त्यापेक्षा अधिक व्यक्तिंना आमंत्रित करण्यात आले होते. अशाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याचा धोका असल्याने आणि संसर्गजन्य आजार पसरून मानवी जिवीतास धोका उत्पन्न होण्याची ही कृती असल्याने प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेऊन तहसीलदार थोरात यांनी फिर्याद दिली. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम आणि साथीचे रोग अधिनियम तसेच विविध कलमान्वये हा गुन्हा दाखल केला आहे.स्नेहभोजन प्रकरणाची माहिती मिळताच जिल्हाधिकारी डॉ.राजेद्र भारुड यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक नंदुबार यांची संयुक्त समिती नेमण्यात आली होती.जिल्ह्यात कोविड-१९ च्या संसर्गावर बºयापैकी नियंत्रण असल्याने संचारबंदीत शिथीलता देण्यात आली आहे. त्याचा उपयोग केवळ अत्यावश्यक बाबींसाठी नागरिकांनी करावा. कोरोनाचा संसर्ग अधिक प्रमाणात होणार नाही यासाठी प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे. लग्न समारंभात ५० पेक्षा अधिक व्यक्तिंना आमंत्रित करू नये. रात्री ९ ते पहाटे ५ या कालावधीत घराबाहेर अनावश्यक फिरू नये. बाहेर फिरताना चेहºयावर मास्क घालावा आणि शारिरीक अंतराचे पालन करावे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे.

भाजप पदाधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी

भाजपच्या जनसंवाद रॅलीत एलईडी लावून ५० पेक्षा अधीक कार्यकर्त्यांना गोळा करणारे भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी व पदाधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करावा अशी मागणी नगरसेवकांसह इतरांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, ९ जून रोजी केंद्रीय संरक्षण मंत्री यांची जनसंवाद रॅली एलईडी लावून भाजपने कार्यकर्त्यांना ऐकण्याची सोय केली होती. त्यासाठी एका हॉटेलवर कार्यकर्ते गोळा झाले होते. त्यात सोशल डिस्टन्सिंगचे पालन झाले नाही. अनेकांनी मास्क लावले नाहीत. जिल्हा प्रशासनाची कुठलीही परवाणगी त्यासाठी घेण्यात आलेली नव्हती. यावेळी कार्यकर्त्यांना अल्पोपहार देखील देण्यात आला होता. ५० पेक्षा अधीक जण या ठिकाणी उपस्थित होते. त्यामुळे भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यांची चौकशी होऊन त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर नगरसेवक कुणाल वसावे, मनिषा वळवी, दिपक दिघे, रवींद्र पवार, प्रमोद शेवाळे, शारदा ढंढोरे यांच्यासह इतरांच्या सह्या आहेत, आता याबाबत काय निर्णय होतो याकडे लक्ष लागून आहे.