सुलतानपुर येथे कोविड लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:23 IST2021-04-29T04:23:08+5:302021-04-29T04:23:08+5:30

ग्रामपंचायत सुलतानपूर येथील महिला सदस्य शीलूबाई बालू पाडवी या गावातील पहिल्या आदिवासी महिला यांनी स्वतःहून कोविड लस घेतली. यावेळी ...

Covid vaccination at Sultanpur | सुलतानपुर येथे कोविड लसीकरण

सुलतानपुर येथे कोविड लसीकरण

ग्रामपंचायत सुलतानपूर येथील महिला सदस्य शीलूबाई बालू पाडवी या गावातील पहिल्या आदिवासी महिला यांनी स्वतःहून कोविड लस घेतली. यावेळी उपस्थित सरपंच आशाबाई आवासे, उपसरपंच वसंत कापडे, ग्रामसेवक आर. व्ही. पाडवी, डॉ. हर्षल पवार, मोहन आवासे, पृथ्वीराज उखळदेव, पांडुरंग पाटील, मुख्याध्यापक दत्तात्रय अहिरे, रत्नकांत भोईटे, देवरे मॅडम, मुसळदे, वसावे, ठाकरे, ग्रा.पं.रोजगार सेवक व शिपाई व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

सुलवाडे येथे लसीकरण : ग्रामपंचायत सुलवाडे यांच्या माध्यमातून कोविड लसीकरणाचे आयोजन केले होते. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी लसीकरण केले. यावेळी गावातील सरपंच कैलास पवार, उपसरपंच अशोक वाघ, ग्रामसेवक बी.आर.माळी, जि. प.शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, तलाठी सुलवाडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पटेल, सी.एच.ओ. मंजूषा दराडे, आरोग्य सेवक नाना कुवर, सोनिया महिंद्रे यांच्यासह लसीकरणाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायतीचे व प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी, आरोग्यसेवक, सेविका, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका तसेच शिक्षक शिक्षकेतर यांनी विशेष परिश्रम घेऊन गावपरिसरात जनजागृती करून नागरिकांचे मोठ्या संख्येने लसीकरण करून घेतले.

Web Title: Covid vaccination at Sultanpur