शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

कुपनलिका खोदून ठेवल्या पण हातपंपच बसविले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 13:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सातपुड्याच्या दुर्गम भागात नळ-पाणी पुरवठा योजना करण्यात अडचणी येत असतात. त्यामुळे अशा ठिकाणी हातपंपाशिवाय ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सातपुड्याच्या दुर्गम भागात नळ-पाणी पुरवठा योजना करण्यात अडचणी येत असतात. त्यामुळे अशा ठिकाणी हातपंपाशिवाय पर्याय राहत नाही. सातपुड्यातील धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात दोन वर्षात शेकडो कुपनलिका खोदण्यात आल्या, परंतु त्यावर हातपंपच बसविला गेला नसल्यामुळे त्या कुपनलिका निरुपयोगी ठरल्या असल्याचे चित्र आहे. येत्या उन्हाळ्यात तरी हातपंप बसवून पाण्याची सोय करावी अशी अपेक्षा गाव, पाड्यातील नागरिकांकडून होत आहे.सातपुड्यातील भौगोलिक परिस्थिती पहाता नळपाणीपुरवठा योजना करणे जिकरीचे आहे. त्यामुळे विहिर किंवा कुपनलिका यांचाच आधार असतो. त्यामुळे अशा भागात मोठ्या प्रमाणावर कुपनलिका मंजुर केल्या जातात. या कुपनलिका मंजुर होत असल्या तरी शासनाच्या निकषानुसार ठराविक मर्यादेपर्यंतच त्या केल्या जातात. तेवढ्या मर्यादेत पाणी लागले नाही तर त्या निरुपयोगी ठरतात. परंतु ज्या ठिकाणी पाणी लागते त्या ठिकाणी अनेकवेळा हातपंपच बसविला जात नसल्याची स्थिती आहे. गेल्या वर्षी खोदून ठेवलेल्या कुपनलिकांवर यंदाचा उन्हाळा आला तरी हातपंप बसविण्यात आला नसल्याची स्थिती आहे.याबाबत यंदातरी या कुपनलिकांवर हातपंप बसवावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. गेल्या वर्षाच्या कुपनलिकांवर हातपंप बाकी असतांना आता नवीन कुपनलिका खोदाई होणार आहे.दरम्यान, हातपंप दुरूस्तीसाठी नेमण्यात आलेल्या पथकांची वाहने ही जुनी झाली आहेत. त्यामुळे ती वाहने निर्लेखीत करून त्याऐवजी दुसरी वाहने घेण्याची शिफारस यापूर्वीच करण्यात आली आहे. पंचायत समिती स्तरावर ही वाहने खरेदी केली जाणार आहेत.याशिवाय यांत्रिकी विभागाअंतर्गत तालुकास्तरावर हातपंप दुरूस्तीसाठी टंचाई निवारणार्थ तातडीची बाब म्हणून वाहनांसह कंत्राटी मणुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी देखील तातडीने उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे.

चालू आर्थिक वर्षात प्रस्तावीत विंधन विहिरी आणि कुपनलिका खोदाई कामासाठी नुकतीच जिल्हा परिषदेची प्रशासकीय मंजुरी घेण्यात आली आहे. त्यासाठी सर्वसाधारण सभेची मान्यता देखील घेण्यात आली आहे.