शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

शहादा केंद्रात आजपासून सुरु होणार कापूस खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 12:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खरेदी केंद्रात सीसीआय अर्थात कॉटन कार्पोरशन आॅफ इंडिया सोमवारपासून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खरेदी केंद्रात सीसीआय अर्थात कॉटन कार्पोरशन आॅफ इंडिया सोमवारपासून पुन्हा कापूस खरेदी सुरु करणार आहे़ या पार्श्वभूमीवर रविवारी केंद्रात १०० वाहनांमध्ये कापूस आणला गेला असून सोमवारी आणखी १०० वाहने दाखल होणार असल्याने कापूस हंगाम यंदाही सुसाट असल्याचे सिद्ध झाले आहे़कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर चीनमध्ये सीसीआयकडून होणारी कापूस निर्यात थांबली आहे़ परिणामी शहादा आणि नंदुरबार केंद्रातील कापूस खरेदी थांबली होती़ साठा करण्यासाठी जागा नसल्याने कापूस खरेदी तब्बल आठ दिवसांपासून बंद पडली होती़ शहादा आणि नंदुरबार केंद्रात खरेदी केलेल्या कापसासह जिनिंगमध्ये किमान १ हजार गाठी पडून होत्या़ कापूस खरेदी बंद झाल्याने शेतकऱ्यांचे हाल सुरु झाले होते़ यंदा कापूस हंगाम लांबला असल्याने बहुतांश ठिकाणी अद्यापही कापूस वेचणी सुुरु आहे़ शेतात आणि घरी कापूस साठा करुन ठेवल्यास चोरीची भिती असल्याने शेतकरी कापूस विक्री करण्यासाठी बाजारात चकरा मारत होते़ यातच खरेदी बंद झाल्याने अनेकांनी नुकसानीला घाबरुन खेडा खरेदी करणाऱ्यांना कापूस विक्री केला होता़निर्माण झालेल्या या स्थितीवर सिसीआयने तोडगा काढून कापूस खरेदी करण्याचे आदेश केंद्रांना दिले होते़ यात नंदुरबार केंद्राने गुरुवारी कापूस खरेदीला प्रारंभ केला़ तर शहादा केंद्रात सोमवारी सकाळी कापूस खरेदी सुरु करण्यात येणार असल्याची माहिती आहे़ सीसीआय शेतकºयांना कापूस खरेदी केल्यानंतर किमान आठ दिवसात पेमेंट करत असल्याने बहुतांश शेतकºयांनी आपला मोर्चा तिकडे वळवला आहे़ विशेष बाब म्हणजे मध्यप्रदेशातील कापूसही जिल्ह्यातील जिनिंगमध्ये शेतकºयांकडून विक्रीसाठी आणला जात असल्याची माहिती आहे़सोमवारपासून कापूस खरेदी होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर शहादा केंद्रात रविवारी चार वाजेपर्यंत ११० वाहने दाखल झाली होती़ यातील कापूस खरेदीला सोमवारी सुरुवात होणार आहे़ प्रतीक्विंटल ५ हजार २०० ते ५ हजार ५४० या दरम्यान कापूस दर देण्यात येत असल्याने शेतकरी येथे कापूस देण्यास उत्सुक आहेत़ सोमवारी सकाळी किमान १०० वाहनांची आवक होणार असल्याची माहिती आहे़ यातून शहादा केंद्रात एका दिवसात २० हजार क्विंटलच्यापुढे कापूस खरेदी होणार आहे़ शहादा येथील सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रात १ लाख १० हजार क्विंटल कापूस आतापर्यंत खरेदी झाला आहे़ सोमवारनंतर त्यात सातत्याने वाढ झाल्यास हंगामाअखेर शहादा बाजारसमिती १ लाख ७५ हजार क्विंटल किंवा त्यापेक्षा अधिक कापूस खरेदी करु शकेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे़नंदुरबार तालुक्यातील पळाशी येथील बाजार समितीच्या खरेदी केंद्रात गुरुवारपर्यंत ५१ हजार क्विंटल कापूस सीसीआयने खरेदी केला होता़ गुरुवारी खरेदी पुन्हा सुरु झाल्यानंतर यात दीड हजार क्विंटलने वाढ झाली आहे़ सोमवारपासून येथे कापूस आवक वाढण्याची शक्यता असल्याची माहिती आहे़ सीसीआयने पाच वर्षाच्या कालावधीनंतर येथून एवढ्या ५० हजार क्विंटलपेक्षा अधिक कापूस खरेदी केला आहे़ बाजारात केवळ सीसीआयच खरेदी करत असल्याने त्यांच्या आवकमध्ये वाढ होऊन यंदाच्या वर्षी खरेदीचा विक्रम होणार आहे़