शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

साठा करण्यास जागा नसल्याने कापूस खरेदी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 12:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पाच वर्षानंतर जिल्ह्यातील कापूस खरेदी केंद्रांमधून सीसीआयने विक्रमी दोन लाख क्विंटल कापूस खरेदी केला ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पाच वर्षानंतर जिल्ह्यातील कापूस खरेदी केंद्रांमधून सीसीआयने विक्रमी दोन लाख क्विंटल कापूस खरेदी केला आहे़ यातून समाधान व्यक्त होत असताना दोन्ही केंद्रातून दिल्लीकडे गाठी निर्यात होणे थांबल्याने नवीन कापूस साठा करण्यासाठी जागा नसल्याने सीसीआयने कापूस खरेदी थांबवली आहे़ परिणामी दोन्ही केंद्रात हजारो कापसाच्या गाठी पडून आहेत़नंदुरबार तालुक्यातील पळाशी येथील राजीव गांधी कापूस खरेदी केंद्रातून सीसीआयने ५१ हजार क्विंटल तर शहादा येथे १ लाख १० क्विंटल कापूस खरेदी केला आहे़ खरेदी केलेल्या कापसाच्या जिनिंगमधून गाठी तयार करुन त्या निर्यातीचे धोरण सीसीआयचे आहे़ परंतू देशातील कापसाची खरेदी करणाऱ्या चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे हाहाकार उडाला आहे़ यातून भारत-चीन व्यापार संबधात आयात निर्यातवर निर्बंध आल्याने त्याचा परिणाम म्हणून कापूस गाठींचा साठा दिवसेंदिवस वाढत आहे़ नंदुरबार येथील जिनिंगमध्ये आजअखेरीस १ हजार कापूस गाठी पडून असल्याची माहिती आहे़ तर शहादा येथील जिनिंगमध्ये गाठींची संख्या प्रचंड वाढल्याने ठेवण्यासाठी भाडोत्री गोदाम शोधण्याची वेळ संबधितांवर येऊन ठेपली आहे़ नंदुरबार येथील केंद्रात जागाच नसल्याने पाच दिवसांपासून तर शहादा येथे तब्बल आठ दिवसांपासून खरेदी बंद आहे़ गोडावून मिळाल्यानंतर पुढील खरेदीची कारवाई सुरु करण्यात येणार असल्याचे बाजार समिती प्रशासनाचे म्हणणे आहे़ येत्या काळात पुन्हा अशी स्थिती उद्भवू नये यासाठी सीसीआय वाढीव गोडावून भाड्याने घेण्याच्या प्रयत्नात आहे़दरम्यान सीसीआयने खरेदी केलेल्या कापसाचे देण्याबाबत अडचणी येत असल्याने कापूस खरेदी बंद झाल्याची माहिती समोर आली होती़ परंतू शेतकऱ्यांना वेळेवर पैसे देण्यात येत असल्याने तसा कोणताही प्रकार नसल्याचे सीसीआय आणि बाजार समित्यांकडून स्पष्ट केले आहे़नंदुरबार बाजार समितीत यंदा कापसाला प्रतीक्विंटल ५ हजार २०० ते ५ हजार ५४० या दरम्यान दर देण्यात आले आहेत़ यातून ५१ हजार क्विंटल कापूस सीसीआयने खरेदी केला आहे़ पळाशी येथील केंद्रावर सीसीआयसोबत खाजगी चार परवानाधारकांकडून खरेदी केली जाते़ परंतू सीसीआयने सर्वाधिक भाव दिल्याने शेतकºयांनी त्यांच्याकडे कापूस विक्रीला प्राधान्य दिले होते़ गेल्या काही दिवसात खरेदी केलेल्या गाठींची निर्यात झालेली नसल्याने त्या पडून आहेत़ यातून मग साठवण्यासाठी जागा मिळत नसल्याने सीसीआयने कापूस खरेदी बंद केली आहे़ खरेदी बंद असल्याच्या काळात सीसीआय आणि बाजार समितीने जिल्ह्यातील विविध भागात साठा कºरण्यासाठी गोडावूनचा शोध सुरु केला आहे़ याला अद्याप यश आलेले नसल्याची माहिती आहे़